Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक काका देवळात जातात…
पूजा वगैरे करून देवापुढं हात जोडून उभे राहतात!
देव - काय इच्छा आहे?
काका - देवा मला एक नोकरी, पैशानं भरलेली खोली, शांत झोप आणि गर्मीपासून सुटका हवी आहे.
देव - तथास्तु
काका आता एटीएमचे गार्ड आहेत…
…
दारूच्या दुकानासाठी कोणतं वास्तुशास्त्र चालतं काही कळत नाही!
दुकान भलेही नाल्याच्या बाजूला असेल,
दक्षिण दिशेला असेल,
मुहूर्त कुठलाही असो,
गर्दी कायम असते!
…
ऑफिसात गेलेल्या नवऱ्याला बायको फोन करते.
बायको - कुठे आहात?
नवरा - तुझ्याकडूनच डबा घेऊन सकाळी ऑफिसला आलोय.
हा कसला प्रश्न विचारतेयस?
बायको - काही नाही ओ
ती शेजारीन पळून गेलीय म्हणून विचारतोय.
…
बायको - भाजी कशी झालीय?
नवरा - मस्त झालीय!
बायको - पण आपला पप्पू बोलत होता की चांगली नाही झाली म्हणून
नवरा - अज्ञान आहे तो.
लग्न झाल्यावर सगळं शिकेल. घरात शांतता ठेवण्यासाठी कुठं काय बोलायचं असतं ते…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)