मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: रिकाम्या पोटी चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला होईल मोठे नुकसान

Fitness Mantra: रिकाम्या पोटी चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला होईल मोठे नुकसान

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 06, 2024 09:10 AM IST

Health Tips: फिट राहण्यासाठी निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे.पण तुम्हाला माहीत आहे का असे अनेक हेल्दी गोष्टी आहेत ज्या रिकाम्या पोटी खाल्ल्यास आरोग्यासाठी फायद्याऐवजी नुकसान होते. कोणत्या गोष्टी रिकाम्या पोटी खाणे टाळावे हे जाणून घ्या.

Fitness Mantra: रिकाम्या पोटी चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला होईल मोठे नुकसान
Fitness Mantra: रिकाम्या पोटी चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला होईल मोठे नुकसान (unsplash)

Foods to Avoid Eating on an Empty Stomach: निरोगी राहण्यासाठी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या डेली अॅक्टिव्हीटीवर प्रभाव टाकणारा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. तुमच्या ऑफिसमध्ये फील्ड वर्क असो किंवा डेस्क वर्क, जे लोक नाश्ता न करता घरातून निघून जातात ते त्यांच्या कामावर नीट लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. एवढेच नाही तर सकाळी रिकाम्या पोटी घरातून बाहेर पडणे आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. या गोष्टी जाणणारे आणि समजणारे लोक सकाळी रिकाम्या पोटी घरातून बाहेर पडण्याची चूक करत नाहीत. पण बऱ्याच वेळा वेळे अभावी किंवा आळशीपणामुळे लोक सकाळी रिकाम्या पोटी काहीही खातात. तुम्हाला माहीत आहे का की असे केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते? अशा अनेक हेल्दी गोष्टी आहेत, ज्या रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

रिकाम्या पोटी करू नका या गोष्टींचे सेवन

चहा-कॉफी

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करता तर तुमच्या या सवयीमुळे ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये कॅफिन आढळून येते. त्याचा मेंदूवर परिणाम होतो.

कच्च्या भाज्या

काही लोक कच्च्या भाज्यांना हेल्दी मानतात आणि रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करतात. पण असे केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास अपचन किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.

आंबट फळे

द्राक्षे, संत्री किंवा आवळा यांसारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटात ॲसिड तयार होते. त्यामुळे पोटदुखी, आम्लपित्त किंवा आंबट ढेकर यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

रताळे

जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी रताळ्याचे सेवन केले तर ते फायदे देण्याऐवजी तुमचे नुकसानही करू शकते. वास्तविक रताळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्यामध्ये असलेल्या टॅनिन आणि पेक्टिनमुळे गॅस्ट्रिक ॲसिडची समस्या उद्भवू शकते. याशिवाय ते तुम्हाला छातीत जळजळ आणि गॅस सारख्या समस्या देखील देऊ शकतात.

दूध आणि केळी

वजन वाढवण्यासाठी सकाळच्या आहारात दूध आणि केळीचा समावेश करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रिकाम्या पोटी केळी आणि दुधाचे सेवन केल्याने अपचन, गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel