२ महिन्यात १८ किलो वजन कमी, viral video मध्ये किती आहे तथ्य? जाणून घ्या!-18 kg weight loss in 2 months know truth is behind viral video ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  २ महिन्यात १८ किलो वजन कमी, viral video मध्ये किती आहे तथ्य? जाणून घ्या!

२ महिन्यात १८ किलो वजन कमी, viral video मध्ये किती आहे तथ्य? जाणून घ्या!

Apr 15, 2024 10:22 AM IST

Social Media: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका डाएट प्लॅन सांगत असलेल्या व्हिडीओमध्ये २ महिन्यात १८ किलो वजन कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये खरच तथ्य आहे का? जाणून घेऊयात

viral weight loss technique
viral weight loss technique (Pixabay )

Oat-Zempic Weight Loss Diet: बदलेल्या खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी, राहणीमानातील सवयी यामुळे वाढणाऱ्या वजनाची समस्या अनेकांना जाणवत आहे. पण फिट राहण्यासाठी आणि दिसण्यासाठी आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. विशेषत: कमी वेळेत वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते. या इच्छेपोटी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट प्लॅनचा अवलंब करत आहेत. सध्या सोशल मीडियावर ओट-झेम्पिक नावाचा एक खास आहार योजना व्हायरल होत आहे. Oat-Zempic हा लठ्ठपणा कमी करणारा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की ओट्समध्ये काही गोष्टी मिसळून खाल्ल्याने अनेक किलो वजन कमी होऊ शकते.

व्हायरल व्हिडीओ

Oat-Zempic नावाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या आहारात १ कप पाण्यात सुमारे अर्धा कप रोल केलेले ओट्स मिसळा. त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्या. हे पेय पिण्यात अजिबात चव नसली तरी लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग मानला जात आहे.

सायकल चालवत बनवली तुर्की कॉफी, या टॅलेंटचा एकदा viral video बघा!

२ महिन्यात १८ किलो वजन कमी केल्याचा दावा!

सोशल मीडियावर असे बोलले जात आहे की याच्या मदतीने २ महिन्यांत १८ किलो वजन कमी होऊ शकते. या आहाराचे नाव Ozempic हे मधुमेहावरील औषध Ozempic एकत्र करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये ओझेम्पिक औषधही वापरले जाते. काही लोक वजन कमी करण्यासाठी हे औषध घेतात.

Corn Coffee: तुम्ही कधी 'कॉर्न कॉफी' प्यायले आहात का? इंटरनेटवर होतेय तुफान viral!

वजन कमी करण्यासाठी ओट्स उपयुक्त?

हो, ओट्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचे कारण असे की ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि वजन कमी करण्यासाठी अनेक आवश्यक पोषक असतात. पण हे लक्षात घेण्यासारखे आहे की आरोग्य तज्ञ याला दुजोरा देत नाहीत. ओट्स खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक कमी होते, परंतु लठ्ठपणा कमी करण्यासाठी केवळ यावर अवलंबून राहणे योग्य नाही. जर तुम्ही हा डाएट फॉलो करत असाल तर नक्कीच आधी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विचार न करता सोशल मीडियावर ओट-झेम्पिक ड्रेंचिंगचा आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

Whats_app_banner
विभाग