Cooking Hack Video: स्वयंपाक शिकायला सुरुवात केली की पहिल्यांदा चपाती बनवायला शिकवलं जाते. पण चपाती अनेक वर्षांच्या सरावानंतर अगदी गोलाकार आणि पातळ होतात. खरं तर आपण एका वेळी एकच चपाती लाटू (kitchen tips) शकतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही एकाच वेळी ५ चपाती लाटू शकता. होय! तुम्ही बरोबर वाचलं. नुकतंच सोशल मीडियावर एक कुकिंग हॅक व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला एकाच वेळी ५ रोट्या लाटत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या चपात्या केवळ गोलाकारच नाहीत तर अतिशय पातळ देखील आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hack_it_with_megha या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
जर तुम्हाला हे हॅक शिकायचं असेल तर व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. व्हिडीओमध्ये असे दिसते की ५ कणिकेचे गोळे एकावर एक ठेवले आहेत आणि नंतर हलक्या हातांनी गोल चपात्या लाटल्या आहेत. यानंतर एक एक करून चपात्या वेगळ्या केल्या गेल्या.
चपाती बनवण्याचा हा हॅक वापरल्यास तुमचा वेळ वाचेल. हे हॅक करताना बघिल्यास तुमचं कौतुकही होईल. सोशल मीडियावर या व्हिडीओला किती पसंती दिली जात आहे. हा व्हिडीओ ७० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. याबाबत सोशल मीडियावरही रंजक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका यूजरने लिहिले, 'हे बनवले जाईल, करून बघा, सहज बनते.' दुसर्याने लिहिले, 'माझी आजी असे बनवायची.', दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, 'मी ५ आणि नंतर ३ चपाती वापरून पाहिल्या, पण दोन्ही वेळेस काम झाले नाही.'
संबंधित बातम्या