Social Media: तुर्की कॉफी बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून युजर्सला धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती सायकल चालवताना कॉफी बनवली. व्हिडीओसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "संपूर्ण देशात मोफत वितरणासह तुर्की कॉफी"
व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती त्याच्या सायकलच्या हँडलवर लाकडी बोर्ड ठेवताना दिसत आहे. व्हिडीओ पुढे जात असताना, दिसते की तो एका भांड्यात कॉफी ओततो आणि बोर्डवर एक लहान गॅस स्टोव्ह ठेवतो. एकदा त्याने कॉफीमध्ये पाणी घालून त्याचे बारीक मिश्रण बनवले की मग तो स्टोव्हवर ठेवतो आणि गरम करतो. क्लिपच्या शेवटी, तो डिस्पोजेबल ग्लासमध्ये कॉफी ओततो आणि ग्राहकाला देतो.
३ फेब्रुवारीला हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. त्या दिवसापासून ५.१ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एवढ्या व्ह्यूजसह हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि संख्या अजूनही वाढत आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले: “किती छान, यास खूप बॅलेन्स लागतो. चांगले काम,” दुसऱ्याने लिहिले, “उत्कृष्ट.” तिसऱ्याने लिहिले, “हे पडू कसं शकत नाही? तुमचं काय म्हणणं आहे?
तुम्हाला हा व्हिडीओ बघून काय वाटलं? आम्हाला कमेंट करून सांगा.