Social Media: अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक फूड व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. यामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल होतात ते विचित्र कॉम्बिनेशन असलेले फूड रेसीपीचे व्हिडीओ. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यंदा यावेळी वापरला गेलेला पदार्थ आहे कॉफी. कॉफीचे वेगवगेळे प्रयोग केले जातात. लोकांना घरी प्रयोग करायला आवडते. असाच एक प्रयोग इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. एथन रोडे नावाच्या व्हिडीओ निर्मात्याने 'कॉर्न कॉफी' बनवली. हे पेय इंटरनेट तुफान व्हायरल झाली आहे.
व्हॉईसओव्हरमध्ये समजते की तो कॉर्न, साखर आणि पाणी एकत्र मिसळतो. गोड कॉर्न सिरप मिळविण्यासाठी तो हे मिश्रण गाळून घेतो. त्यानंतर या सिरपचा वापर स्वीट कॉर्न कोल्ड फोम बनवण्यासाठी करतो. पुढे, तो एस्प्रेसोचा एक ताजा कप तयार करतो. नंतर, एका काचेच्या ग्लासात तो बर्फाचे तुकडे, दूध, कॉर्न कोल्ड फोम आणि एस्प्रेसो टाकतो. हे सर्व हलक्या हाताने मिक्स करतो आणि पेय पितो.
इंस्टाग्राम रीलला आतापर्यंत ३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी या कॉफीची तुलना इतर देशांतील पेयांशी केली आहे.
" हे मला थोडं कुरूप वाटतंय."
"नाही, मी खरोखर आनंदाने हा प्रयत्न करेन."
"मला वाटले की तो भाजून मक्याचे दाणे बारीक करेल."
"हे भयानक आहे की अलौकिक बुद्धिमत्ता आहे हे OMG काही सांगू शकत नाही."
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)