मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yami Gautam Pregnant: यामी गौतमने चाहत्यांना दिली गुडन्यूज; ‘आर्टिकल ३७०’च्या प्रमोशनदरम्यान दाखवला बेबी बंप!

Yami Gautam Pregnant: यामी गौतमने चाहत्यांना दिली गुडन्यूज; ‘आर्टिकल ३७०’च्या प्रमोशनदरम्यान दाखवला बेबी बंप!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2024 06:51 PM IST

Yami Gautam Pregnant: यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गौतम आई होणार असून, या वर्षीच ती बाळाला जन्म देणार आहे.

Yami Gautam Pregnant
Yami Gautam Pregnant

Yami Gautam Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसाठी हे वर्ष खास आनंदाचे असणार आहे. यामी गौतमने नुतीच चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गौतम आई होणार असून, या वर्षीच ती बाळाला जन्म देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामी गौतम साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे. यामी आणि आदित्यने आतापर्यंत या प्रेग्नन्सीच्या चर्चांवर मौन बाळगले होते. मात्र, आता आगामी ‘आर्टिकल ३७०’च्या प्रमोशनदरम्यान यामीने आपला बेबी बंप फ्लाँट केला आहे.

अभिनेत्री यामी गौतमचा आगामी चित्रपट 'आर्टिकल ३७०'चा ट्रेलर आज एका कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आला. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी आदित्य धर याने चित्रपट ट्रेलर लाँचच्या वेळी ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. आपली पत्नी-अभिनेत्री यामी गौतम आई होणार असून, लवकरच आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Viral Video: ‘छावा’च्या सेटवर विकी कौशलचा अपघात; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते काळजीत!

आज यामी गौतमचा आगामी चित्रपट 'आर्टिकल ३७०' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. एका कार्यक्रमात हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यादरम्यान यामी गौतम पती आदित्य धरसोबत या इव्हेंटला पोहोचली होती. नव्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसोबतच या जोडप्याने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील शेअर केली. गेल्या अनेक दिवसांपासून यामी गौतम आई होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. या वृत्तांना आता यामी गौतमचा पती आणि चित्रपट निर्माता आदित्य धर याने दुजोरा दिला आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली. यामी लवकरच आई होणार असून, ती या वर्षी मे महिन्यात बाळाला जन्म देईल, असे म्हटले जात आहे.

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटामध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाची निर्मिती आदित्य धर याने केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून, २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी आणि आदित्यने या चित्रपटाचे प्रमोशन सुरू होण्यापूर्वीच, त्यांची ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.

यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह ४ जून २०२१ रोजी झाला होता. दोघांची पहिली भेट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’च्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी २ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नाच्या ३ वर्षानंतर हे जोडपे आई-वडील होणार आहे.

WhatsApp channel

विभाग