मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Actress Kasammal Death : पैशासाठी मुलानेच केली बेदम मारहाण; विजय सेतुपतीची आई साकारणाऱ्या अभिनेत्रीचे निधन

Actress Kasammal Death : पैशासाठी मुलानेच केली बेदम मारहाण; विजय सेतुपतीची आई साकारणाऱ्या अभिनेत्रीचे निधन

Feb 08, 2024 02:10 PM IST

Actress Kasammal Death: दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरस्टार विजय सेतुपती याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कसम्मल यांचे निधन झाले आहे.

Actress Kasammal Death
Actress Kasammal Death

Actress Kasammal Death: पैशांसाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते याचं उदाहरण नुकतच साऊथ मनोरंजन विश्वात पाहायला मिळालं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरस्टार विजय सेतुपती याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कसम्मल यांचे निधन झाले आहे. मुलानेच केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. दारू पिण्यासाठी पैसे द्यावेत म्हणून त्यांच्या मुलाने आईकडे तगादा लावला होता. मात्र, पैशांसाठी नकार देताच त्याने कसम्मल यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ७१ वर्षीय कसम्मल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

अभिनेत्री कसम्मल यांनी साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैदसी विवसयी’ या चित्रपटात अभिनेत्री कसम्मल यांनी साकारलेली आईची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात त्या साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती याच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत नालंदी, विजय सेतुपती आणि योगी बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. एम. मणिकंदानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील कसम्मल यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

The Kerala Story: अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

आई आणि मुलामध्ये नेमके काय झाले?

मदुराई शहरातील उसिलमपट्टीजवळील अनैयुरमध्ये कसम्मल आणि त्यांचा मुलगा पी. नामाकोडी हे दोघे राहत होते. गेल्या १५ वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्यांचा मुलगा हा आपल्या आईसोबतच राहत होता. कसम्मल यांच्या मुलाला दारूचे व्यसन जडले होते. दारूसाठी तो दररोज आईकडे पैशांची मागणी करत होता. तर, कसम्मल या देखील मुलाच्या वागण्यामुळे हैराण झाल्या होत्या. ४ फेब्रुवारी रोजी दारूच्या पैशांवरूनच मायलेकामध्ये जोरदार भांडण झालं. या वादात त्यांच्या मुलाने लाकडी दांड्याने आईला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

उसिलमपट्टी तालुका पोलिसांनी या प्रकरणात कसम्मल यांच्या मुलाला अटक केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री कसम्मल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला असून, स्थानिक शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळावरून नामाकोडी यांना ताब्यात घेतलं असून, खुनाचे शस्त्र देखील ताब्यात घेतले आहे. कसम्मल यांच्या मुलाला अटक करून पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

WhatsApp channel
विभाग