मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ‘छावा’च्या सेटवर विकी कौशलचा अपघात; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते काळजीत!

Viral Video: ‘छावा’च्या सेटवर विकी कौशलचा अपघात; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते काळजीत!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2024 03:10 PM IST

Vicky Kaushal Accident Viral Video: अभिनेता विकी कौशल 'छावा' चित्रपटासाठी एका जबरदस्त ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता. यादरम्यान अपघात घडला आणि त्यात विकी जखमी झाला.

Vicky Kaushal Accident Viral Video
Vicky Kaushal Accident Viral Video

Vicky Kaushal Accident Viral Video: चित्रपटाच्या सेटवर स्टंट सीन शूट करताना अनेकदा बॉलिवूड कलाकार जखमी होतात. यापूर्वीही अनेक कलाकार सेटवर जबर जखमी झाले आहेत. आता सेटवर जखमी होणाऱ्या स्टार्सच्या यादीत विकी कौशलचेही नाव सामील जाले आहे. अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या सेटवर एका सीक्वेंसच्या शूटिंगदरम्यान विकी कौशल जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर विकी कौशल याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशलच्या हाताला दुखापत झालेली दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विकी कौशल 'छावा' चित्रपटासाठी एका जबरदस्त ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता. यादरम्यान अपघात घडला आणि त्यात विकी जखमी झाला. या जखमी अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, विकी डाव्या हाताला प्लास्टर बांधलेला दिसत आहे आणि तो त्याच्या कारमधून बाहेर पडून घराच्या दिशेने जाताना दिसत आहे. अभिनेता विकी कौशल आता पुढील काही आठवडे विश्रांती घेऊन हाताची काळजी घेणार असल्याचे बोलले जात आहे. यातून दुखापतीतून बरा झाल्यानंतर तो पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Musafiraa Actor: पूजा सावंतचा ‘मुसाफिरा’ प्रेक्षकांना घडवतोय परदेशवारी! ‘या’ अभिनेत्याने साकारली मुख्य भूमिका

विक्कीच्या हातातील फ्रॅक्चर पाहून चाहते अस्वस्थ झाले आहेत. अभिनेत्याच्या हातावर प्लास्टर दिसत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते काळजीत पडले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करून चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

'छावा'मध्ये विकी साकारणार मुख्य भूमिका!

अभिनेता विकी कौशल नुकताच 'सॅम बहादूर' या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटातील विकी कौशल याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. आता विकी कौशल ‘छावा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच, विकीने इंस्टाग्रामवर पडद्यामागील त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट 'छावा'ची झलक शेअर केली आहे. 'छावा' हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार असून, रश्मिका मंदाना ‘येसूबाई भोसले’ यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि नील भूपालम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘छावा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

WhatsApp channel