Vicky Kaushal: सेटवर दारू पिऊन पोहोचला होता विकी कौशल! पुढे काय झालं माहितीये का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vicky Kaushal: सेटवर दारू पिऊन पोहोचला होता विकी कौशल! पुढे काय झालं माहितीये का?

Vicky Kaushal: सेटवर दारू पिऊन पोहोचला होता विकी कौशल! पुढे काय झालं माहितीये का?

Published Jan 10, 2024 12:51 PM IST

Vicky Kaushal Drunk On Set: विकी कौशल एकदा चक्क दारू पिऊन चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता. पुढे जे झालं त्याने सगळेच हैराण झाले.

Vicky Kaushal Drunk On Set
Vicky Kaushal Drunk On Set

Vicky Kaushal Drunk On Set: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल अतिशय प्रतिभावान अभिनेत्यांच्या यादीत आहे. विकी कौशल याने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले आहे. विकीने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. विकीचे वडील सॅम कौशल हे चित्रपटसृष्टीत सक्रिय असून देखील विकीला भरपूर संघर्ष करावा लागला होता. या सगळ्यात अनेक किस्से चर्चेत असताना आता आणखी एक किस्सा चर्चेत आला आहे. विकी कौशल एकदा चक्क दारू पिऊन चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता.

अभिनेता विकी कौशल याने ‘संजू’ या चित्रपटाचत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक सीन होता ज्यात विकीला परेश रावल यांच्यासोबत ड्रिंक करण्याचा सीन करायचा होता. विकीने या सीनसाठी ऑडिशनही दिली होती. मात्र, हा सीन करतानाचा एक किस्सा विकीने एका मुलाखतीत सांगितला होता. या शूटिंगच्या दिवशी विकी कौशल दारू पिऊन सेटवर गेला होता. हा रात्रीचा सीन होता, पण शूटिंग दिवसा होते. त्यामुळे तो सीन अगदी खराखुरा वाटावा म्हणू विकी कौशलने इडली सांबारसोबत काही मद्य प्राशन केलं होतं. अशाच स्थितीत तो सीन शूट झाला होता. परेश रावलसोबतचा तो ड्रिंक सीन किती परफेक्ट होता, हे नंतर सगळ्यांनाच कळलं. या सीनसाठी त्याचं कौतुकही झालं होतं. ही गोष्ट विकी आजपर्यंत विसरू शकलेला नाही.

Bollywood Singers Favorite Food: डोसा ते गुलाबजाम; तुमच्या लाडक्या गायकांना काय खायला आवडतं माहितीये का?

विकीने अतिशय प्रामाणिकपणे हा किस्सा आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केला होता. यावरून अभिनेता त्याच्या कामाप्रती किती पॅशनेट आहे ते लक्षात येते. त्याच्या या विधानावरून तो आपले काम चोख करण्यासाठी किती प्रयत्न करतो, याची कल्पना येऊ शकते. ‘संजू’ या चित्रपटात त्याची सहाय्यक भूमिका होती. मात्र, दुय्यम भूमिका निभावून देखील विकीने प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्याच्या वाट्याला ‘उरी’ हा चित्रपट आला. या चित्रपटातून तर त्याने आपल्या अभिनयचा जलवा सगळ्यांनाच दाखवला.

विकी कौशल नुकताच शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात विकीने खास भूमिका साकारली होती. आता विकी ‘छावा’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात विकीसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उत्तेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Whats_app_banner