मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 8th Feb: सायलीच्या वागण्यामुळे अर्जुन गोत्यात येणार! अखेर लग्नाचा पुरावा दाखवावाच लागणार

Tharala Tar Mag 8th Feb: सायलीच्या वागण्यामुळे अर्जुन गोत्यात येणार! अखेर लग्नाचा पुरावा दाखवावाच लागणार

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2024 01:45 PM IST

Tharala Tar Mag 8 February 2024 Serial Update: रस्त्यावर रडणारी सायली आणि तिला समजावणार अर्जुन यांना पाहून लोकांना वेगळाच संशय येणार आहे.

Tharala Tar Mag 8 February 2024
Tharala Tar Mag 8 February 2024

Tharala Tar Mag 8 February 2024 Serial Update: ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना सायली आणि अर्जुन यांची धमाल बघायला मिळणार आहे. सायलीने चुकून दारू प्यायल्यामुळे आता अर्जुनला तिला सांभाळताना नाकीनऊ आले आहेत. यातच आता तिला हॉटेलबाहेर घेऊन गेल्यामुळे अर्जुनला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सायलीच्या वागण्यामुळे आता अर्जुनला लोकांची बोलणी खावी लागणार आहेत. सायलीच्या विचित्र हरकती पाहून आता अर्जुनला लोकांकडून शाब्दिक मार खावा लागणार आहे.

दारूच्या नशेत धुंद झालेली सायली आता रस्त्यावर देखील मोठमोठ्याने गाणी वाजवून नाचणार आहे. याच धुंदीत आता सायली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हातगाडीवर चढणार आहे. सायलीला सावरण्याच्या नादात अर्जुनला लाथांचा मार देखील खावा लागणार आहे. आता हातगाडीवर चढलेली सायली अर्जुनला गाडीला धक्का मारायला सांगणार आहे. मात्र, अर्जुन यासाठी नकार देणार आहे. तर, अर्जुनचा नकार ऐकून सायली रस्त्यावरच जोरजोराने रडू लागणार आहे. आता सायलीला भोकाड पसरताना बघून आजुबाजूची लोकं तिथे जमा होणार आहेत.

Actress Kasammal Death: पैशासाठी मुलानेच केली बेदम मारहाण;विजय सेतुपतीची आई साकारणाऱ्या अभिनेत्रीचे निधन

रस्त्यावर रडणारी सायली आणि तिला समजावणार अर्जुन यांना पाहून लोकांना वेगळाच संशय येणार आहे. अर्जुन सायलीला त्रास तर देत नाहीयेना, हे बघण्यासाठी आणि त्याला तंबी देण्यासाठी काही लोक पुढे येणार आहेत. या लोकांना समजावताना अर्जुनची मात्र पाचावर धारण होणार आहे. अखेर आपल्या मोबाईल मधले लग्नाचे फोटो दाखवून अर्जुन सायली आपली पत्नी असल्याचं सिद्ध करणार आहे. अर्जुनच्या या खुलाशानंतर जमलेली गर्दी पंग्णार आहे. मात्र, दुसरीकडे सायलीचं रडगाणं सुरूच राहणार आहे. आता सायलीला कशा प्रकारे समजवावं या संभ्रमात अर्जुन पडला आहे. सायलीच्या या वागण्यामुळे आता अर्जुन लोकांचा मार खाताखाता वाचला आहे.

सायलीचं हे अवखळ रूप पाहून अर्जुन देखील वेडावला आहे. सायलीच्या या वेडेपणात आता तो देखील सामील होणार आहे. सायली हातगाडीवर चढून नाचत असताना आता अर्जुन देखील तिच्या तालावर नाचून दाखवणार आहे. नाचण्याच्या नादात आणि दारूच्या नशेत सायली हातातल्या बांगड्या, पायातील चप्पल सगळं काही काढून फेकून द्यायला सुरुवात करते. आता अर्जुन आपल्या पत्नीला सावरत तिचा हा सगळा पसारा आवरणार आहे. यांनतर सायली चंद्राला पांढरा सूर्य म्हणून, रस्त्याच्या कडेला असलेली सायकल घोडा म्हणून चालवायला लागणार आहे. आता बेफाम झालेल्या सायलीला अर्जुन कसा आवर घालणार, हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel