मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Musafiraa Actor: पूजा सावंतचा ‘मुसाफिरा’ प्रेक्षकांना घडवतोय परदेशवारी! ‘या’ अभिनेत्याने साकारली मुख्य भूमिका

Musafiraa Actor: पूजा सावंतचा ‘मुसाफिरा’ प्रेक्षकांना घडवतोय परदेशवारी! ‘या’ अभिनेत्याने साकारली मुख्य भूमिका

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2024 02:06 PM IST

Musafiraa Actor Chetan Mohture: पूजा सावंत हिचा 'मुसाफिरा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच चित्रपटातील एका अभिनेत्याचं नाव सध्या चर्चेत आहे.

Musafiraa Actor Chetan Mohture
Musafiraa Actor Chetan Mohture

Musafiraa Actor Chetan Mohture: अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. दरम्यान आता तिचा एक नवा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून पूजा सावंत हिने प्रेक्षकांना परदेशवारी घडवली आहे. पूजा सावंतच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता चेतन मोहतुरे याने मुख्य भूमिका साकारली आहे. चेतन मोहतुरेच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. विशेष म्हणजे चेतन मोहतुरे याचा हा पहिलाच चित्रपट आहे.

'मुसाफिरा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच चित्रपटातील एका अभिनेत्याचं नाव सध्या चर्चेत आहे. ‘स्पर्श माझा’, ‘साथ असताना तू’ अशा अनेक प्रसिद्ध मराठी म्युझिक अल्बम्सनंतर अभिनेता चेतन मोहतुरेने ‘मुसाफिरा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिच्यासोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. ‘मुसाफिरा’ चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण स्कॉटलॅण्डला चित्रीत झालं आहे. शिवाय या बिग बजेट मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या ‘आयल ऑफ स्काय’वर चित्रित केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

Tharala Tar Mag 8th Feb: सायलीच्या वागण्यामुळे अर्जुन गोत्यात येणार! अखेर लग्नाचा पुरावा दाखवावाच लागणार

माझं स्वप्न पूर्ण झालं: चेतन मोहतुरे

अभिनेता चेतन मोहतुरे त्याच्या पहिल्याच चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला की, ‘मराठी चित्रपटात काम करायला मिळणं ही बालपणापासूनची माझी इच्छा होती. आई बाबांसोबत चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायचो, तेव्हा मला फार अप्रूप वाटायचं की, मी मोठा होऊन चित्रपटात काम करेन. आता माझं स्वप्न ‘मुसाफिरा’ या चित्रपटाद्वारे पूर्ण झालं आहे. करिअरच्या सुरूवातीलाच पुष्कर जोग आणि पूजा सावंत यांच्यासोबत काम करायला मिळणं, हे माझं भाग्यचं आहे.’

या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना चेतन म्हणाला, ‘मुसाफिरा चित्रपटात मी विहानची व्यक्तिरेखा साकारली आहे. मला विहानची स्क्रीप्ट मिळताच मी लगेच होकार दिला होता. कारण ती व्यक्तिरेखा मला प्रचंड आवडली होती. चित्रपटातील विहान हा फ्री स्पिरीट मुलगा आहे. आणि तो आयुष्य खऱ्या अर्थाने जगतो. मी स्वत:ला विहानच्या व्यक्तिरेखेला कुठे ना कुठे रिलेट करतो. म्हणून मी ही व्यक्तिरेखा निवडली. जेव्हा मी पूजा सावंतला पहिल्यांदा सेटवर भेटलो, तेव्हा मला कळलं की, कलाकार जितका अनुभवी असतो तितकाच तो डाऊन टू अर्थ देखील असायला हवा. तिच्याकडून मी अभिनयाविषयी अनेक गोष्टी शिकलो.’

... आणि अवघ्या ५ मिनिटांमध्ये केक हजर!

या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा सांगताना तो म्हणाला, ‘स्कॉटलॅण्डला मुसाफिराच्या सेटवर शूट सुरू होतं. माझा वाढदिवस होऊन ३ दिवस झाले होते. पण, मी कोणाला सांगितलं नव्हतं. मग, असचं एकदा लंच करताना मला एकाने विचारलं की तुझा वाढदिवस कधी आहे. मग, मी सांगितलं की ३ दिवसापूर्वी माझा वाढदिवस झाला. क्रू मेंबर्सनी अवघ्या पाच मिनिटांमध्ये माझ्यासमोर केक आणला आणि मला अचानक वाढदिवसाचं सुंदर सप्राईज दिलं. माझ्या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवरचा तो वाढदिवस माझ्या आयुष्यभर आठवणीत राहील.’

WhatsApp channel