मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yami Gautam Pregnancy : यामी गौतम प्रेग्नंट? सोशल मीडियावर Video Viral

Yami Gautam Pregnancy : यामी गौतम प्रेग्नंट? सोशल मीडियावर Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2024 09:33 AM IST

Yami Gautam Video Viral: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.

Yami Gautam
Yami Gautam

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही कायमच चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. लवकरच तिचा आर्टिकल ३७० हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा टीझर लाँच इवेंटला यामीने हजेरी लावली. दरम्यान, व्हिडीओ पाहून यामी प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. पण यामीने यावर बोलणे टाळले. त्यानंतर पुन्हा यामीचा एक व्हिडीओ समोर आला. यावरुन तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आले.

यामी आणि तिचा पती आदित्य धर नुकताच मुंबई एकत्र दिसले. यावेळी यामीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. तर आदित्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघे एकत्र असताना यामीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. या ड्रेसमध्ये यामीचा बेबीबंप दिसत असल्याचे समोर आले. त्यामुळे तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना जोर आला. आता यामी खरच प्रेग्नंट आहे की या केवळ चर्चा आहे याबाबत लवकरच माहिती समोर येईल.
वाचा: 'फायटर'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

सोशल मीडियावर यामीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. काहींनी यामीला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी यामीने ओढणीच्या सहाय्याने बेबी बंप लपवला अशी कमेंट केली आहे.

यामीने जून २०२१मध्ये दिग्दर्शक आदित्य धरशी गुपचूप लग्न केले. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा आर्टीकल ३७० लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी ओएमजी 2, 'भूत पोलीस', 'चोर निकल के भागा', 'लॉस्ट', 'दसवी, 'ए थर्सडे' या चित्रपटात तिने काम केले होते.

WhatsApp channel

विभाग