मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘भीगे होठ तेरे..’ हे सुपरहिट गाणे देणारा कुणाल गांजावाला सध्या काय करतो? जाणून घ्या

‘भीगे होठ तेरे..’ हे सुपरहिट गाणे देणारा कुणाल गांजावाला सध्या काय करतो? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 14, 2024 09:21 AM IST

आज १४ एप्रिल रोजी कुणाल गांजावाला याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या ‘भीगे होठ तेरे..’ या सुपरहिट गाण्याच्या वेळचा किस्सा

‘भीगे होठ तेरे..’ हे सुपरहिट गाणे देणारा कुणाल गांजावाला सध्या काय करतो? जाणून घ्या
‘भीगे होठ तेरे..’ हे सुपरहिट गाणे देणारा कुणाल गांजावाला सध्या काय करतो? जाणून घ्या

बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध गायक म्हणून कुणाल गांजावालाची ओळख आहे. एकेकाळ असा होता की त्याच्या प्रत्येक गाण्याने चाहत्यांना वेड लागले होते. त्याची गाणी एकापाठोपाठ एक सुपरहिट ठरत होती. २००४ साली प्रदर्शित झालेल्या 'मर्डर' या चित्रपटातील ‘भीगे होठ तेरे..’ हे त्याचे गाणे भलतेच गाजले होते. खरं तर कुणालच्या करिअरला कलाटणी देणारे हे गाणे ठरले. आज १४ एप्रिल रोजी कुणाल गांजावालाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ‘भीगे होठ तेरे..’ गाण्याविषयी, तसेच तो सध्या काय करतो हे देखील जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

२००४ साली प्रदर्शित झालेला अनुराग बासूचा ‘मर्डर’ हा चित्रपट अनेकांच्या आजही चांगलाच लक्षात आहे. अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अत्यंत बोल्ड दृश्य, किसिंग सीन्स आणि त्यातील हृदयस्पर्शी गाण्यामुळे चर्चेत आला होता. या चित्रपटाले 'भीगे होंठ तेरे' हे गाणे भलतेच हिट झाले होते. पण तुम्हाला माहिती आहे का कुणाल गांजावालाने स्वरबद्ध केलेले हे गाणे केवळा २० मिनिटात रेकॉर्ड केले होते. स्वत: कुणालने एका मुलाखतीमध्ये या गाण्या मागचा किस्सा सांगितला आहे.
वाचा: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा

गाण्याचे बोल ऐकून बसला होता धक्का

“ज्यावेळी मला या गाण्यासाठी विचारण्यात आले त्यावेळी मी गाण्याचे बोल ऐकून दोन मिनीटे शॉक झालो होतो. मला गाण्यातील शब्दांची त्यावेळी खरच खूप जास्त भीती वाटली होती. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार काम करत आहेत हेदेखील मला माहित नव्हते. तसेच या गाण्याची तयारी करण्यासाठीदेखील मला फारसा वेळ मिळाला नाही. मला फक्त इतकच सांगण्यात आले होते की हे गाणे अत्यंत रोमॅण्टीक अंदाजात गायले गेले पाहिजे. त्यामुळे जेव्हा मी गाण्यासाठी खऱ्या अर्थाने हे गाणे हातात घेतले तेव्हा नर्व्हस झालो होतो” असे कुणाला म्हणाला होता.
वाचा: वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका वेगळ्या वळणावर

२० मिनिटात झाले गाणे शूट

पुढे तो म्हणाला, “मी या गाण्याच्या सराव करण्यासाठी काही वेळ मागितला होता. मात्र निर्मात्यांनी मला स्पष्ट नकार दिला. मी केवळ २० मिनीटांमध्ये हे गाणे तयार करुन ते रेकॉर्डदेखील केले. या संगीत क्षेत्रात मी कधी करिअर करु शकेन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. कारण मला कधीच पार्श्वगायक व्हायचे नव्हते. तसंच मी उत्तमरित्या गाणे म्हणू शकतो यावरही माझा सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. मात्र या गाण्यानंतर माझे आयुष्य बदलले. मी अनेक गाणी गायली आणि अनेक दिग्गजांनी मला ती संधीदेखील दिली.”
वाचा: छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…

IPL_Entry_Point

विभाग