मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या ४ दिवसांत केलं बजेट वसूल; पाहा आतापर्यंतचे कलेक्शन

The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या ४ दिवसांत केलं बजेट वसूल; पाहा आतापर्यंतचे कलेक्शन

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 09, 2023 10:14 AM IST

The Kerala Story Collection: केरळ स्टोरीला माउथ पब्लिसिटीचा मोठा फायदा होत आहे. चित्रपटाची कमाई पाहता, ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मीर फाईल्स'ला मागे टाकेल असे वाटत आहे.

The Kerala Story
The Kerala Story

The Kerala Story Collection: अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाबाबत जितके वाद होतात, तेवढाच फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. ‘द केरळ स्टोरी’ मर्यादित पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतरही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी देखील या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला ३५.२५ कोटींच्या कलेक्शनसह धमाकेदार कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केरळ स्टोरीला माउथ पब्लिसिटीचा मोठा फायदा होत आहे. चित्रपटाची कमाई पाहता, ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मीर फाईल्स'ला मागे टाकेल असे वाटत आहे. केरळ स्टोरीच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन काश्मीर फाईल्सपेक्षा खूपच चांगले होते. सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी'ने सोमवारी १५ कोटींहून अधिक कमाई केली. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाला ४ दिवसांत ४६ कोटींहून अधिक कमाई करण्यात यश आले आहे. हा चित्रपट महाराष्ट्र आणि केरळमध्ये चांगला व्यवसाय करत आहे.

Get Together: पहिल्या प्रेमाची आठवण सांगणारा ‘गेट टुगेदर’; शरद पवार यांनी केलं चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण!

सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार 'द केरळ स्टोरी'ची कमाई लवकरच १०० ते २०० कोटींपर्यंत जाऊ शकते. मात्र, अवघ्या ४ दिवसांत या चित्रपटाने मेकिंग बजेट वसूल केले आहे. चित्रपटाचे एकूण बजेट ३५ ते ४० कोटींच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते, जे अवघ्या ४ दिवसांत वसूल झाले आहे.

‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. केरळसह अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाच्या कथेला तीव्र विरोध होत आहे.

IPL_Entry_Point