मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीमला धमक्यांचे मेसेज, मुंबई पोलिसांनी पुरवली सुरक्षा

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीमला धमक्यांचे मेसेज, मुंबई पोलिसांनी पुरवली सुरक्षा

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 09, 2023 08:20 AM IST

Threats to The Kerala Story Team Members: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबर्सपैकी एकाला अनोळखी नंबरवरून धमकीचा संदेश आला होता. धमकी मिळाल्यानंतर आता त्याला पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.

The Kerala Story
The Kerala Story

Threats to The Kerala Story Team Members: 'द केरळ स्टोरी' चित्रपटामागे लागलेला वादांचा ससेमिरा अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीय. आता या चित्रपटाच्या क्रू मेंबरना धमक्या मिळाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या एका क्रू मेंबरला एका अनोळखी फोन नंबरवरून धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता, असे माहिती देताना मुंबई पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. 'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबर्सपैकी एकाला अनोळखी नंबरवरून धमकीचा संदेश आला होता. या संदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले की, ‘मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने क्रू मेंबरला धमकावले आणि त्याला एकटे घर सोडू नका असे सांगितले. मोठ्या पडद्यावर ही कथा दाखवून त्याने चांगले काम केलेले नाही, असे देखील यात म्हटले आहे. धमकी मिळाल्यानंतर आता त्याला पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. परंतु, या संदर्भात कोणतीही लेखी तक्रार दाखल न केल्यामुळे एफआयआर नोंदवता आलेला नाही.

Sai Pallavi Birthday: अभिनेत्रीच नव्हे तर निष्णांत डॉक्टरही आहे साई पल्लवी! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी..

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने या वादग्रस्त चित्रपटावर बंदी घातली. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट शांतता भंग करू शकतो आणि समाजात द्वेष व हिंसाचार पसरवू शकतो, असे म्हणत पश्चिम बंगाल राज्य सरकारने या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घातली. महिलांच्या संघर्षावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात पहिल्यांदा महिलांचा धर्म बदलल्याचे दाखवले आहे. मग, त्यांना तस्करीच्या माध्यमातून इसिसच्या कॅम्पपर्यंत कसे पोहोचवले जाते ते देखील दाखवण्यात आले आहे.

मात्र, राजकीय स्तरावर या चित्रपटाचा मोठ्या प्रमाणात निषेध होत असून, अनेकांच्या वतीने टीकाही केली जात आहे. बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर भाजपशासित मध्य प्रदेशात चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या चित्रपटाला आरएसएसचा प्रचार असल्याचे म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग