मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Get Together: पहिल्या प्रेमाची आठवण सांगणारा ‘गेट टुगेदर’; शरद पवार यांनी केलं चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण!

Get Together: पहिल्या प्रेमाची आठवण सांगणारा ‘गेट टुगेदर’; शरद पवार यांनी केलं चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 09, 2023 08:41 AM IST

Get Together Movie Poster Launch: माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ‘गेट टुगेदर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Movie Poster Launch By NCP Leader Sharad Pawar
Movie Poster Launch By NCP Leader Sharad Pawar

Get Together Movie Poster Launch: माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ‘गेट टुगेदर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. 'वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात' अशी कॅची टॅगलाईन असलेला ‘गेट टुगेदर’ हा चित्रपट येत्या २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील या वेळी उपस्थित होते. ‘गेट टुगेदर’ या चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. त्याशिवाय आतापर्यंत रिलीज करण्यात आलेल्या दोन्ही गाण्यांना उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sai Pallavi Birthday: अभिनेत्रीच नव्हे तर निष्णांत डॉक्टरही आहे साई पल्लवी! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी..

‘देवमाणूस’ या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, ‘अॅटमगिरी’, ‘वाघेऱ्या’ अशा चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. पावसाळी वातावरणात एकांतात असलेलं जोडपं टीझरमध्ये दिसलं आणि पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या संवाद देखील ऐकायला मिळाले आहेत. चित्रपटाचा टीझर रोमँटिक असल्यानं या चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे. शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न ‘गेट टुगेदर’ या चित्रपटात करण्यात आला आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत "गेट टुगेदर" या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

IPL_Entry_Point

विभाग