मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Maze Sangati : कॅन्सरशी कसं लढायचं?; शरद पवारांनी आत्मचरित्रातून दिल्या टिप्स

Lok Maze Sangati : कॅन्सरशी कसं लढायचं?; शरद पवारांनी आत्मचरित्रातून दिल्या टिप्स

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 08, 2023 12:38 PM IST

Sharad Pawar on fighting Cancer : कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराशी यशस्वी लढा कसा दिला हे शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात विस्तारानं सांगितलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar (HT_PRINT)

Sharad Pawar on fighting Cancer : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवनावरील 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या पुढील भागाचं नुकतंच प्रकाशन झालं. यात शरद पवार यांनी राजकीय मनोगताबरोबरच कॅन्सरच्या जीवघेण्या आजाराशी दिलेल्या लढ्याचीही माहिती दिली आहे. त्यांनी कॅन्सरग्रस्तांना काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराशी यशस्वी लढा कसा दिला हे शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात विस्तारानं सांगितलं आहे. मनाचा दृढनिश्चय, उपचारात सातत्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामावर लक्ष केंद्रित केल्यास या आजारावर मात करता येते, असा मंत्र त्यांनी दिला आहे.

२००४ मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं. मात्र, निवडणुकीचं वर्ष असल्यानं त्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉ. सुलतान प्रधान यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. आठवडाभरानंतर पवारांनी राज्यव्यापी प्रचाराला सुरुवात केली. मोहीम संपल्यानंतर वेदनादायी केमोथेरपीचं सत्र सुरू झालं. त्यानंतर शरद पवार पुन्हा दिल्लीत परतले, तेव्हा कॅन्सर आटोक्यात ठेवण्यासाठी ते दररोज रुग्णालयात जात असत. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना विश्रांती घेण्याचा आग्रह केला, परंतु त्यांनी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला, असं त्यांनी लिहिलं आहे.

विलासराव देशमुख यांच्याशी झालेल्या संवादाची आठवणही शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे. 'विलासरावांची तब्येत बिघडल्याचं जेव्हा कळलं, तेव्हा पवारांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी, वजन कमी झाल्यामुळं मला खूप अशक्तपणा आल्याचं विलासरावांनी पवारांना सांगितलं. पवारांनी त्यांना कॅन्सर स्पेशालिस्टकडं चलण्याची विनंती केली. मात्र, फार काही चिंतेची गोष्ट नाही असं म्हणत विलासरावांनी टाळलं. माजी मंत्री आर. आर. पाटील यांनाही कॅन्सर झाला होता, मात्र २०१४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर असल्यानं त्यांनी ही गोष्ट कुणालाही कळू दिली नव्हती, असंही पवारांनी आत्मचरित्रात नमूद केलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग