मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील त्या सीनमुळे अभिनेत्री सोनिया बलानी मिळतायत धमक्या!

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील त्या सीनमुळे अभिनेत्री सोनिया बलानी मिळतायत धमक्या!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 21, 2023 01:45 PM IST

The Kerala Story Actress Sonia Balani: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ‘आसिफा’ हे पात्र हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करताना दाखवले आहे. या चित्रपटात ‘आसिफा’ची भूमिका अभिनेत्री सोनिया बलानीने केली आहे.

Supreme Court On The Kerala Story
Supreme Court On The Kerala Story (HT)

The Kerala Story Actress Sonia Balani: सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा 'द केरळ स्टोरी' वेगवेगेळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाने याच्या कथानकाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात ‘आसिफा’ हे पात्र हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करताना दाखवले आहे. या चित्रपटात ‘आसिफा’ची भूमिका अभिनेत्री सोनिया बलानीने केली आहे. तिने मोठ्या पडद्यावर हे ग्रे शेड कॅरेक्टर खूप छान साकारले आहे. मात्र, अशा प्रकारच्या भूमिकेचे कौतुक करण्याऐवजी आता तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकत्याच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत सोनियाने ही भूमिका साकारणे तिच्यासाठी किती आव्हानात्मक होते याबद्दल सांगितले आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे ती खूप खूश आहे. पण, सध्या ती हे यश साजरं करण्याच्या मूडमध्ये नाही. आसिफा हे या चित्रपटातील एक ग्रे शेड पात्र आहे, जी तिच्या मैत्रिणींना हिंदू धर्माविरुद्ध भडकवून मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्यात यशस्वीही होते. ‘द केरळ स्टोरी'च्या चित्रीकरणादरम्यान ही भूमिका करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते, असे तो म्हणाला. आसिफ ही एक अशी भूमिका होती, ज्यात तिला हिंदू देवतांच्या विरोधात बोलायचे होते.

TMKOC: करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या! ‘तारक मेहता..’च्या ‘बावरी’चे पुन्हा गंभीर आरोप

या मुलाखतीत सोनिया म्हणाली की, यातील एका सीनमध्ये तिला तिच्या सहकलाकाराला 'थुंकून ये' म्हणायचे होते. हा सीन तिच्या को-स्टारला त्यांच्या रील लाईफ वडिलांसोबत करायचा होता. हा सीन फक्त चित्रपटासाठीच होता, पण सोनियासाठी ते इतकं सोपं नव्हतं. यावेळी ती म्हणली की, आसिफाची आत्महत्या आणि इतर सर्व काही तिच्या डोक्यात इतके शिरले होते की, घरी आल्यानंतरही ती त्याच मानसिकतेत राहिली. मात्र, आता हळूहळू ती यातून बाहेर पडत आहे.

'आसिफा' हे स्वार्थी आणि धूर्त पात्र आहे. सोनिया बालानीने सांगितले की, 'द केरळ स्टोरी' रिलीज झाल्यानंतर तिच्यावर एक-दोन नव्हे, तर खूप द्वेषयुक्त कमेंट्स आल्या. सोशल मीडियावर तिला धमक्या देण्यात आल्या, त्यामुळे ती खूप घाबरली होती. सोनिया म्हणाली की, हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक खूप संवेदनशील झाले आहेत. धमक्या मिळाल्यानंतर तिने घराबाहेर पडणे देखील बंद केले होते. मात्र, काहीही झाले तरी यात तिच्या कुटुंबाने तिची साथ सोडली नाही.

IPL_Entry_Point

विभाग