मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या...

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 21, 2023 09:04 AM IST

Rashmika Madanna in Pushpa 2: सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीवल्लीचा मृतदेह दिसत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Rashmika Madanna
Rashmika Madanna

Rashmika Madanna in Pushpa 2: अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने २०२२मध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सिक्वेलबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटची स्टोरी लीक झाल्याचे म्हटले जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ‘पुष्पा २’मध्ये काय होणार हे प्रेक्षकांच्या समोर आले आहे. मात्र, यामागचे सत्य काहीतरी वेगळेच आहे. ‘पुष्पा: द राईज’मध्ये, पुष्पाचे लग्न श्रीवल्लीशी होणार आहे. आता दुसऱ्या भागात पुढची कथा काय असेल याबाबत अटकळ बांधली जात आहे.

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीवल्लीचा मृतदेह तिरडीवर ठेवलेला दिसत आहे. रश्मिकाचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘पुष्पा २’मध्ये श्रीवल्लीला मारले जाईल, खलनायक रश्मिकाचा जीव घेईल आणि आता पुष्पा त्याचा बदला घेईल, अशी या चित्रपटाची कथा असेल, असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत.

Rashmika
Rashmika

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना असे वाटत आहे की, हा फोटो ‘पुष्पा २’मधील आहे. तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो चित्रपटाच्या सेटवरून लीक झाल्याचा लोकांचा समज आहे. पण या व्हायरल होणाऱ्या फोटोमागे एक वेगळेच सत्य आहे. यापूर्वी, अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’मधील त्याचा एक लूक व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेता साडी नेसलेला आणि कपाळावर मोठी बिंदी लावून दिसला होता.

यापूर्वीही अशी अफवा होती की, ‘पुष्पा २’मध्ये श्रीवल्लीचे पात्र मरणार आहे आणि या फोटोने अफवांना आणखी हवा दिली आहे. परंतु, या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती रश्मिका मंदाना नसल्याचे समोर आले आहे. सध्या श्रीवल्लीचा फोटो म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो ‘पुष्पा २’चा नाही, तर महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरणभात लोणचा कोण नाय कोणाचा' या मराठी चित्रपटातील आहे.

IPL_Entry_Point