मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abdu Rozik: ‘किसी का भाई किसी की जान’मधून अब्दूचा सीन का कापला? पाहा काय म्हणाला अभिनेता...

Abdu Rozik: ‘किसी का भाई किसी की जान’मधून अब्दूचा सीन का कापला? पाहा काय म्हणाला अभिनेता...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 21, 2023 08:02 AM IST

Abdu Rozik in Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात अब्दूला कास्ट करण्यात आले होते. मात्र, शेवटी या चित्रपटातून त्याचा सीन कट करण्यात आला.

Salman Khan-Abdu Rozik
Salman Khan-Abdu Rozik

Abdu Rozik in Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान याच्या बिग बॉस या शोमध्ये झळकलेला ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोझिक याने आता स्वतःचा मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्याच्या क्युटनेसला खूप पसंती मिळाली आहे. बिग बॉस शो दरम्यान त्याने त्याच्या क्युटनेसने चाहत्यांची मने जिंकली होती आणि खूप प्रशंसा मिळवली. शोचा होस्ट सलमान खानसोबत अब्दूची बाँडिंगही खूप खास होती आणि परिणामी, त्याला सलमान खानच्या आधीच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, नंतर या चित्रपटातून आपली भूमिका का कापण्यात आली, याबद्दल अब्दू रोझिकने सांगितले आहे.

बॉलिवूड चित्रपटाचा भाग बनणे ही कुणासाठीही एक मोठी गोष्ट आहे. पण, चित्रपटातून एखाद्याचे सीन कापले गेले तर, मात्र पदरी निराशा पडते. अब्दु रोझिकच्या बाबतीतही तेच झालं. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात त्याला कास्ट करण्यात आले होते. मात्र, शेवटी या चित्रपटातून त्याचा सीन कट करण्यात आला होता. आता चाहत्यांचा संभ्रम दूर करत अब्दूने यामागचे नेमके कारण सांगितले आहे.

Aditya Chopra Birthday: फिल्मी स्टाईलने सुरू झाली होती आदित्य-राणीची प्रेमकथा; यश चोप्राही झालेले नाराज!

जेव्हा सलमान खानने बिग बॉस १६च्या पहिल्या फायनललिस्ट स्पर्धकाची अर्थात अब्दू रोझिकच्या नावाची घोषणा केली होती, तेव्हा त्याने असेही सांगितले होते की, तो देखील सलमानच्या पुढील चित्रपटाचा एक भाग असणार आहे. तर, शो सुरू होण्यापूर्वीच अब्दूने याआधीच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी शूटिंग केले होते. पण, नंतर अब्दूला काही सीन पुन्हा शूट करण्यासाठी ४ दिवसांचा वेळ लागणार होता.

मात्र, त्याचवेळी अब्दूने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता आणि नियमांनुसार, जो कोणी बिग बॉसच्या घरात एकदा प्रवेश करेल तो शो संपेपर्यंत किंवा तो बाहेर पडेपर्यंत बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे सलमान खानच्या चित्रपटातील अब्दूचा सीन कापावा लागला होता. ‘बिग बॉस १६’मध्ये अब्दूने आपला दमदार खेळ दाखवला आणि चाहत्यांची मने जिंकली.

IPL_Entry_Point

विभाग