मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: विक्रमही सोडणार का शिल्पीची साथ? ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवा ट्वीस्ट!

Tu Chal Pudha: विक्रमही सोडणार का शिल्पीची साथ? ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवा ट्वीस्ट!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 20, 2023 02:40 PM IST

Tu Chal Pudha Latest Episode: शिल्पीचा खरा चेहरा समोर आल्यानंतर आता विक्रम देखील शिल्पीची साथ सोडणार आहे. यामुळे शिल्पीला मोठा धक्का बसणार आहे.

Tu Chal Pudha
Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Episode: तू चाल पुढं’ या मालिकेत आता एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. अश्विनीच्या संसारात विष कालवून, तिला स्वतःच्याच घरातून बाहेर जाण्यास भाग पाडणारी शिल्पी आता स्वतः तोंडघशी पडणार आहे. अश्विनीचा संसार मोडण्याचा प्रयत्न करणारी शिल्पी आता स्वतः देखील एकाकी पडणार आहे. शिल्पीचा खरा चेहरा समोर आल्यानंतर आता विक्रम देखील शिल्पीची साथ सोडणार आहे. यामुळे शिल्पीला मोठा धक्का बसणार आहे.

विद्युतशी घटस्फोट घेतल्यानंतर आता शिल्पी विक्रमशी लग्न करण्यासाठी धडपड करत आहे. विक्रमसोबत लग्न करण्यास परवानगी मिळावी म्हणून शिल्पी आई-बाबांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ती खास स्वयंपाकाचा बेत करते. आई-वडिलांशी ओळख करून देण्यासाठी विक्रमला जेवायला बोलवते. मात्र, आई-बाबा दोघेही जेवणावरून उठून जातात. यामुळे शिल्पी त्यांच्यावर प्रचंड संतापते. शिल्पीचं हे रूप पाहून आता विक्रम देखील पुरता गोंधळून गेला आहे. बाबा चिडले आहेत, हे लक्षात आल्यावर तो त्यांची समजूत काढयला जातो.

Yash Chopra: रोमँटिक चित्रपटांचे जादूगार यश चोप्रा यांना बनायचे होते इंजिनिअर! पण मुंबईत आले अन्...

विक्रम बाबांशी समजावण्याच्या सुरात बोलतो. शिल्पीच्या वतीने तो त्यांच्या माफी देखील मागतो. विक्रमचं हे वागणँ बघून बाबा देखील मावळ होतात. मात्र, ते विक्रमला शिल्पीचा खरा स्वभाव सांगतात. ती स्वतःच्या पोटच्या मुलाचा देखील विचार करत नाही, ती तुझा विचार कसा करेल? असा प्रश्न बाबा विक्रमाला करतात. यासोबतच ते शिल्पीशी लग्न न करण्याचा इशारा देखील विक्रमला देतात. बाबांचं हेच बोलणं आता विक्रमला पटलं आहे. त्यामुळेच आता विक्रम देखील शिल्पीपासून दूर जाणार आहे.

बाबांचे बोल ऐकून आता खरंच विक्रम शिल्पीची साथ सोडणार, की तिच्या पुढच्या खेळीत तिची साथ देणार हे ‘तू चाल पुढं’ मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग