मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aditya Chopra Birthday: फिल्मी स्टाईलने सुरू झाली होती आदित्य-राणीची प्रेमकथा; यश चोप्राही झालेले नाराज!

Aditya Chopra Birthday: फिल्मी स्टाईलने सुरू झाली होती आदित्य-राणीची प्रेमकथा; यश चोप्राही झालेले नाराज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 21, 2023 07:35 AM IST

Happy Birthday Aditya Chopra: आदित्य चोप्राच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी सुंदर प्रेमकथा पाहिल्या आहे. पण आदित्यची स्वतःची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

Aditya Chopra
Aditya Chopra

Happy Birthday Aditya Chopra: बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा आज (२१ मे) आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. आदित्य चोप्राच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी सुंदर प्रेमकथा पाहिल्या आहे. पण आदित्यची स्वतःची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आदित्यच्या पहिल्या लग्नाच्या घटस्फोटापासून ते राणी मुखर्जीच्या पहिल्या भेटीपर्यंतची त्यांची प्रेमकथा जबरदस्त ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेली आहे. राणीसोबतचे नाते ऐकून तर, आदित्यच्या वडिलांना अर्थात यशराज चोप्रा यांना खूप राग देखील आला होता. इतकंच नाही तर वडिलांच्या रागामुळे त्याला घराबाहेर देखील पडावे लागले होते.

ट्रेंडिंग न्यूज

आदित्य चोप्रा प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मोठा मुलगा आहे. कॅमेऱ्यासमोर यायला लाजणाऱ्या आदित्यने कॅमेऱ्याच्या मागे राहून आपली अशी काही जादू दाखवली की, त्याचे वडील यश चोप्रा देखील त्याच्यावर प्रभावित झाले होते. वयाच्या १८ व्या वर्षी आदित्यने वडील यश चोप्रा यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. आदित्यचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो केवळ २३ वर्षांचा होता.

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या ‘जय श्रीराम’ गाण्याने जिंकलं चाहत्यांचं मन! सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ!

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या फिल्मी प्रेमकथेबद्दल सांगायचे झाले तर, त्यांची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. पहिल्या भेटीतच आदित्यचे मन राणीवर फिदा झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्यनेच चित्रपट निर्माता करण जोहरला राणीला 'कुछ कुछ होता है'मध्ये कास्ट करण्यास सांगितले होते. या चित्रपटानंतर दोघांमध्ये प्रेम फुलू लागले होते. यानंतर दोघांनी एकामेकांना सिक्रेटली डेट करण्यासही सुरुवात केली.

मात्र, वडील यश चोप्रा आदित्य आणि राणीच्या या नात्यावर खूप नाराज होते. यश यांच्या रागामुळे आदित्यला घर सोडून अनेक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले होते. अखेर आदित्यने २००९ मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि २०१४ मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीशी लग्न केले. दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग इटलीमध्ये पार पडले होते. आता त्यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली असून, या जोडीला आदिरा नावाची एक सुंदर मुलगी आहे.

IPL_Entry_Point

विभाग