
The Romantics, Anushka Sharma: रोमान्स चित्रपटाचे बादशाह अर्थात बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या कारकिर्दीवर आधारित माहितीपट ‘द रोमँटिक्स’ नुकताच रिलीज झाला आहे. यात अनेक कलाकारांनी आपल्या ‘यशराज फिल्म्स’मधील आठवणी शेअर केल्या आहेत. या माहितीपटाच्या एक भागात अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील सामील झाली होती. यावेळी तिने यश चोप्रा नाही, तर त्यांचा मुलगा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा याच्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. हा किस्सा आता चांगलाच चर्चेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, आता अनुष्का शर्माने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, आदित्य चोप्राने तिला तिच्या चित्रपट पदार्पणाबद्दल कोणालाही सांगू नको, असे बजावले होते. अगदी आई-वडिलांना देखील ही आनंदाची गोष्ट सागण्यासाठी आदित्यने तिला अडवले होते. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा याने केले होते. यावेळी सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष नवोदित अभिनेत्री अनुष्का शर्मावर होतं.
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘द रोमॅंटिक्स’ या माहितीपटात अनुष्का शर्माने याचा खुलासा केला आहे. आदित्य चोप्राचा हा किस्सा सांगताना अनुष्का म्हणाली की, ‘आदित्य चोप्राची इच्छा होती की, मी चित्रपटाची बातमी माझ्या आई-वडिलांनाही सांगू नये. सगळं काही अगदी गुपित होतं. कुणालाच याबद्दल माहित नव्हतं. मी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आहे हे कोणालाही कळू नये, असे आदित्य चोप्राला वाटत होते. यावेळी आदित्य चोप्राने मला थेट सांगितले होते की, मी कोणालाही काहीच सांगू शकत नाही, अगदी माझ्या आई-वडिलांनाही नाही.’
अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान स्टारर ‘रब ने बना दी जोडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटातून अनुष्का शर्मालाही प्रसिद्धी मिळाली. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटानंतर अनुष्काने अनेक चित्रपटात काम केले. अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपट झुलन गोस्वामी यांचा बायोपिक आहे. याचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केले आहे. अनुष्काचा हा आगामी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
