मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2: 'पुष्पा २'मध्ये समांथा पुन्हा करणार आयट साँग? अखेर अभिनेत्रीने सोडले मौन, म्हणाली...

Pushpa 2: 'पुष्पा २'मध्ये समांथा पुन्हा करणार आयट साँग? अखेर अभिनेत्रीने सोडले मौन, म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 11, 2023 05:06 PM IST

Samantha Ruth Prabhu: समंथाला ‘पुष्पा २’ या चित्रपटात देखील एका आयटम साँग करण्याची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता समांथाने यावर वक्तव्य केले आहे.

समांथा
समांथा

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटातील ‘ऊ अंटवा..’ हे आयटम साँग देखील प्रचंड गाजले होते. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या या गाण्यातील समंथा रुथ प्रभू आणि अल्लू अर्जुन यांची केमिस्ट्री चाहत्यांनाप्रचंड आवडली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुन्हा समांथा आयटम साँग करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता स्वत: समांथाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

समांथाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला 'पुष्पा २ चित्रपटाचा भाग होणार का?' असा प्रश्न समांथाला विचारण्यात आला होता. त्यावर तिने 'जर तुम्ही मला विचाराल की मी पुष्पा चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. मी या चित्रपटात आयटम साँग करणार नाहीये' असे उत्तर दिले. समांथाने दिलेल्या या उत्तराने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

'पुष्पा २' मधील आयटम साँगसाठी समंथाला मोठी रक्कम देखील ऑफर करण्यात आली होती. ‘पुष्पा २’ मधील ३ मिनिटांच्या गाण्यासाठी समंथाला ५ कोटी रुपये ऑफर करण्यात आले होते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, दिग्दर्शक सुकुमारने वारंवार विनंती करूनही समंथाने ही ऑफर स्वीकारली नाही. समंथा रुथ प्रभूला तिच्या करिअरच्या या टप्प्यावर कोणत्याही आयटम साँगमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र, समंथाच्या या नकारानंतर तिला या चित्रपटात छोट्या भूमिकेची ऑफरही आली होती. त्याबद्दल अभिनेत्रीने नेमका काय निर्णय घेतला हे समोर आलेले नाही.

'पुष्पा' या चित्रपटामध्ये समंथाने तिच्या 'ऊ अंटवा' या आयटम साँगमधून आपल्या अदांची जादू दाखवली आहे. समंथाच्या या गाण्याचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. सध्या अभिनेत्री अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. समंथा तिच्या आगामी मेगा बजेट चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. अभिनेत्री लवकरच 'शाकुंतलम' चित्रपटात दिसणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग