मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर आता चित्रपटाचा सीक्वल येणार? मेकर्सची मोठी घोषणा!

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर आता चित्रपटाचा सीक्वल येणार? मेकर्सची मोठी घोषणा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2023 05:56 PM IST

The Kerala Story Sequel: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये तब्बल १३५ कोटी रुपये कमावले आहेत. लवकरच हा चित्रपट १५० कोटींचा टप्पा गाठणार आहे.

The kerala Story
The kerala Story

The Kerala Story Sequel: अभिनेत्री अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. इतके वाद होऊनही चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. तर, अनेक राज्यांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. काही लोक या चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत, तर बरेच लोक ‘द केरळ स्टोरी’च्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत. या सगळ्याच्या दरम्यान दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी 'द केरळ स्टोरी' चित्रपटाविषयी नवे अपडेट दिले आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये तब्बल १३५ कोटी रुपये कमावले आहेत. लवकरच हा चित्रपट १५० कोटींचा टप्पा गाठणार आहे. अभिनेत्री अदा शर्माच्या चित्रपटाला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत एक नवीन वक्तव्य केले आहे. सुदीप्तो सेन यांनी ‘द केरळ स्टोरी’च्या सिक्वेलबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सुदीप्तो सेन यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे.

Butterfly : खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी; आता मोठ्या पडद्यावरही एकत्र दिसणार अभिजीत अन् मधुराची जोडी!

यावेळी सुदीप्तो सेन म्हणाले की, ‘त्यांच्याकडे अशा अनेक कथा आहेत ज्या त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. ते म्हणाले की, 'द केरळ स्टोरी’च्या कौतुकानंतर मला आता आराम करायचा नाही. मी या चित्रपटावर सात वर्षे काम केले आहे. हा चित्रपट हिट होणार हे मला आधीच माहित होते.’ दिग्दर्शकाचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर आता 'द केरळ स्टोरी'च्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग