मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना अदा शर्माने सुनावले बोल! म्हणाली...

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना अदा शर्माने सुनावले बोल! म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2023 01:00 PM IST

The Kerala Story: यश मिळत असताना ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हटले जात आहे. यावर आता अदा शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.

The Kerala Story
The Kerala Story

The Kerala Story:द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, या चित्रपटाला मोठ्या वादांचा चांगला फायदा मिळत आहे. चित्रपटाच्या बंपर कमाईमुळे या चित्रपटाची स्टारकास्टही खूप खूश आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अदा शर्माने अनेकवेळा आपला आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हटले जात आहे. यावर आता अदा शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरवर सुफियान खान नावाच्या ट्विटर युजरने या चित्रपटावर कमेंट करताना लिहिले की. ‘तुम्ही प्रोपगंडा फिल्म बनवून पैसे कमवू शकता, पण आदर नाही.’ त्या व्यक्तीच्या या ट्विटवर अदा शर्माने टोमणे मारत उत्तर दिले की, ‘मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. धन्यवाद! आता फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून मला इतका आदर दिल्याबद्दल..’ नुकताच केरळ स्टोरी हा चित्रपट आणखी ४० देशांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्या, रविवारी या चित्रपटाने पहिल्या वीकेंडपेक्षा जास्त कमाई करून, आपला वेग अजूनही अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे.

‘द केरळ स्टोरी’ने आतापर्यंत किती कमाई केली आहे?

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी आठ कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर या चित्रपटाची कमाई वाढतच गेली. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ३५ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. आता दुसऱ्या वीकेंडला ५५ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तर, तिसऱ्या वीकेंडच्या शेवटी हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग