Sidharth Shukla Birth Anniversary: मालिका विश्वासच 'बिग बॉस' गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा आज जरी या जगात नसला तरी, चाहत्यांच्या हृदयात तो आजही जिवंत आहे. आज (१२ डिसेंबर) सिद्धार्थ शुक्ल याचा वाढदिवस आहे. सिद्धार्थ शुक्ला याने फार कमी वेळात आपली ओळख बनवली होती. त्याने टीव्ही मालिका विश्वात आपला दबदबा निर्माण केला होता. 'बिग बॉस १३'मध्ये आल्यानंतर त्याला एक वेगळी ओळख मिळाली होती. 'बिग बॉस १३'च विजेतेपद पटकावून सिद्धार्थ शुक्लाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. मात्र, फार कमी वयातच त्याने या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाले होते.
अभिनयाच्या विश्वात आपल्या नावाचा गाजावाजा करणाऱ्या सिद्धार्थ शुक्ला याला कधीच अभिनय विश्वात यायचे नव्हते. त्याला इंटेरिअर डिझायनींगच्या क्षेत्रात आपले नाव कमवायचे होते. यासाठी सिद्धार्थ शुक्लाने भरपूर मेहनत घेतली होती. मुंबईच्या प्रसिद्ध 'रचना संसद' या महाविद्यालयातून त्याने इंटेररिअर डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, इंटेरिअर डिझायनिंगमध्ये पदवी मिळवल्यानंतर सिद्धार्थने नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, याच दरम्यानच्या काळात त्याचं मन मॉडेलिंगच्या दिशेने झेपावू लागलं. त्याने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती.
पिळदार शरीरयष्टी असणारा सिद्धार्थ शुक्ला मॉडेलिंग जगतात प्रसिद्धी मिळवू लागला. यानंतर त्याने आपलं 'इंटेरिअर डिझायनिंग'चं स्वप्न गुंडाळून ठेवलं. दुसरीकडे तो मॉडेलिंग जगतात आपलं नाव कमावू लागला होता. या क्षेत्रात आल्यानंतर देखील त्याने आपल्या लूक्स आणि स्टाईलवर प्रचंड मेहनत घेतली. याच दरम्यान त्याने सिद्धार्थ शुक्ल याने एक फॅशन शो देखील जिंकला. २००५मध्ये सिद्धार्थ शुक्ला याला तुर्कीमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत 'वर्ल्ड बेस्ट मॉडेल' असा किताब मिळाला होता. यानंतर त्याने हिंदी मालिकांमध्ये एंट्री केली. 'बालिकावधू' या मालिकेत त्याने 'शिव' ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला होता.
२०२१मध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाले होते. त्याच्या अशा अचानक एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता. चाहते आजही त्याच्या आठवणीत अनेक पोस्ट आणि आठवणी शेअर करताना दिसतात.