Sidharth Shukla Birthday: सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी शहनाज गिलची खास पोस्ट; म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidharth Shukla Birthday: सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी शहनाज गिलची खास पोस्ट; म्हणाली...

Sidharth Shukla Birthday: सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी शहनाज गिलची खास पोस्ट; म्हणाली...

Dec 12, 2022 09:56 AM IST

Sidharth Shukla Birthday: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाज गिल ही जोडी चाहत्यांची लाडकी जोडी होती. या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं.

Sidharth Shehnaaz
Sidharth Shehnaaz

Sidharth Shukla Birthday: ‘बिग बॉस’ मधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस आहे. आज जरी सिद्धार्थ या जगात नसला, तरी चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. आज त्याच्या वाढदिवशी सिद्धार्थच्या आठवणीत त्याचे चाहते भावूक होताना दिसत आहे. यातच आता अभिनेत्री शहनाज गिल हिने देखील एक पोस्ट शेअर करत सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिद्धार्थचा फोटो शेअर करत शहनाजने एक खास कॅप्शन दिलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाज गिल ही जोडी चाहत्यांची लाडकी जोडी होती. या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. चाहत्यांनी या जोडीला प्रेमाने ‘सिदनाज’ असं नाव दिलं होतं. मात्र, सिद्धार्थच्या अकाली निधनाने ही जोडी तुटली. आजही शहनाज सिद्धार्थच्या आठवणीतच जगताना दिसते. सिद्धार्थच्या वाढदिवशी शहनाजने त्याचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘मी तुला पुन्हा भेटेन’ असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर आता चाहते देखील कमेंट्स करत आहेत.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी ‘बिग बॉस १३’मध्ये दिसली होती. इथूनच त्यांच्यात छान मैत्री जमली होती. चाहत्यांनी त्यांच्या नावाने अनेक हॅशटॅगही बनवले होते. शहनाज सिद्धार्थवर प्रेम करत होती. अनेकदा तिने हे प्रेम व्यक्त देखील केलं होतं. दोघं एकमेकांच्या सोबत दिसायचे. पण, २ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाले. त्याच्या निधनामुळे शहनाज गिल पूर्णपणे खचून गेली होती.

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. ती काही काळ मनोरंजन विश्वातून देखील दूर झाली होती. मात्र, आता तिने सिद्धार्थच्या आठवणींसोबत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आज देखील त्याच्या वाढदिवशी अवघ्या एका ओळीत शहनाजने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिची ही पोस्ट पाहून त्यांचे चाहते देखील भावूक झाले. शहनाजने एक केक आणून त्यावर सिद्धार्थ लिहून तो कापून, एकटीनेच सिद्धार्थचा वाढदिवस देखील साजरा केला. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Whats_app_banner