मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shatir The Beginning : बॉलिवूड कलाकारांनाही मराठीची भुरळ! सस्पेन्स थ्रिलर 'शातिर’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shatir The Beginning : बॉलिवूड कलाकारांनाही मराठीची भुरळ! सस्पेन्स थ्रिलर 'शातिर’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 09, 2023 10:46 AM IST

Shatir The Beginning : 'शातिर THE BEGINNING' या चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेवर आधारित असून चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे.

Shatir The Beginning
Shatir The Beginning

Shatir The Beginning : मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. गेल्या काही काळामध्ये अनेक हटके विषय घेऊन मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. ‘झोम्बिवली’ हा झोंबीपट असो, वा ‘व्हिक्टोरिया’ आणि ‘वाळवी’सारखे हॉरर, सस्पेन्स चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळवत आहेत. मात्र, यामध्ये सस्पेन्स थ्रिलर प्रकारात कमी चित्रपट असल्याचे दिसते. त्यातही महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलरपट अपवादानेच दिसतात. आता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने एका हटके विषयावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'शातिर THE BEGINNING' असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाची कथा- सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे. तर पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले असून त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. रेश्मा वायकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'शातिर THE BEGINNING' या चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेवर आधारित असून चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले असून गीतकर वैभव देशमुख यांच्या गीतांना वैशाली सामंत, शाल्मली खोलगडे यांचा स्वरसाज आहे. 'शातिर THE BEGINNING' या चित्रपटात मराठीतील आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसह काही नवोदित कलाकार सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी अद्याप कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे समोर येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग