'या' चित्रपटातून मधुर भांडारकर करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, हृता दुर्गुळे साकारणार भूमिका-madhur bhandarkar upcoming marathi movie circuit ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'या' चित्रपटातून मधुर भांडारकर करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, हृता दुर्गुळे साकारणार भूमिका

'या' चित्रपटातून मधुर भांडारकर करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, हृता दुर्गुळे साकारणार भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 02, 2023 03:35 PM IST

Madhur Bhandarkar: मधुर भांडारकर यांच्या या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सर्किट
सर्किट (HT)

"चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३" , "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन" अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत.

मधुर भांडारकर यांच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाचे नाव 'सर्किट' असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश पेंढारकर करत असून अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
वाचा: पत्नीच्या अंघोळ करतानाच्या फोटोवर सिद्धार्थची प्रतिक्रिया, ‘असे फोटो टाकणं…’

वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी या दोघांनीही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.अभिनेता रमेश परदेशी याची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे. रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ "सर्किट" या चित्रपटात झाल्याचं आपल्याला टीजरमध्ये पाहता येतं. त्यामुळेच चित्रपटाच्या कथेविषयी आणि चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडी यांची आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून शब्बीर नाईक यांनी काम पाहिले असून संकलन दिनेश पुजारी यांचे आहे तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीबाबत निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले, की गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी जवळून पाहिली आहे. मी हिंदी चित्रपटात कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाची निर्मिती-प्रस्तुती करण्याची इच्छा होती. ती संधी मला "सर्किट" या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे

Whats_app_banner
विभाग