मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satish Kaushik: ‘मिस्टर इंडिया’मधील ‘कॅलेंडर’ ते ‘देख तमाशा देख’चे ‘मुथाशेठ’; सतीश कौशिक यांच्या गाजलेल्या भूमिका!

Satish Kaushik: ‘मिस्टर इंडिया’मधील ‘कॅलेंडर’ ते ‘देख तमाशा देख’चे ‘मुथाशेठ’; सतीश कौशिक यांच्या गाजलेल्या भूमिका!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 09, 2023 07:43 AM IST

Satish Kaushik famous characters: सतीश कौशिक यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या होत्या.

Satish Kaushik
Satish Kaushik

Satish Kaushik Passes Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झालं. त्यांचा निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून देखील त्यांनी अनेक दमदार चित्रपट दिले. मात्र, अभिनेता म्हणून ते नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांनी मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. यातील काही पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.

ट्रेंडिंग न्यूज

सतीश कौशिक नेहमीच सहाय्यक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. कधी त्यांनी चित्रपटात खलनायक साकारला, तर कधी एखादं खळखळवून हसवणारं पात्र... त्यांच्या अशाच काही गाजलेल्या भूमिका...

मिस्टर इंडिया- कॅलेंडर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी अभिनित ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात सतीश कौशिक यांनी ‘कॅलेंडर’ ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती.

साजन चले ससुराल- मुथू स्वामी

गोविंदा, तब्बू आणि करिश्मा कपूर यांचा ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट १९९६मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सतीश कौशिक यांनी ‘मुथू स्वामी’ हे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्यांनी आपल्या विनोदाने सगळ्यांना भरपूर हसवले.

स्वर्ग

१९९०मध्ये रिलीज झालेल्या 'स्वर्ग' या चित्रपटामध्येही त्यांनी अतिशय अप्रतिम भूमिका साकारली होती. या चित्रपटात ते गोविंदासोबत सहाय्यक भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांचे डायलॉग्सही खूप हिट झाले होते.

मिस्टर अँड मिसेस खिलाडी- ज्योतिषी

सतीश कौशिक यांनी १९९७मध्ये रिलीज झालेला अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’मध्ये ज्योतिषाची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये ते अक्षय कुमारचे मामा बनले होते.

देख तमाशा देख- मुथा शेठ

२०१४मध्ये आलेल्या 'देख तमाशा देख' या चित्रपटात सतीश कौशिक मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात सतीश ‘मुथाशेठ’च्या भूमिकेत झळकले होते. 'देख तमाशा देख' हा चित्रपट राजकारण आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टींवर भाष्य करणारा होता.

IPL_Entry_Point

विभाग