मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satish Kaushik : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

Satish Kaushik : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 09, 2023 09:19 AM IST

Satish Kaushik Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी वयाच्या ६६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Satish Kaushik Passes Away
Satish Kaushik Passes Away

Satish Kaushik Dies at 66: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्ददर्शक सतीश कौशिक यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६६व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड कलाकार अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सतीच कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सतीश कौशिक यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत अनुपम खेर यांनी म्हटले आहे की, "मला माहिती आहे की, मृत्यू हे जगातील शेवटचे सत्य आहे. पण मी माझ्या जीवनात असा कधीच विचार केला नव्हता की, माझ्या जवळच्या मित्राबाबत मला कधी असे लिहावे लागेल. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम लागेल. सतीश तुझ्याशिवाय माझे आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही, अशा आशयाचे अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे.

सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणाच्या महेंद्रगड येथे झाला. त्यांनी १९८३ मध्ये मासूम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर जवळपास १०० चित्रपटात त्यांनी काम केले. दरम्यान, १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तू रुप की रानी मै चोरो का राजा' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाय ठेवला. त्यांनी जवळपास १२ चित्रपट दिग्ददर्शित केले आहेत.

IPL_Entry_Point