Dunki Drop 5: 'डंकी' नावाचा अर्थ तरी काय?; अखेर शाहरुख खानने केला खुलासा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dunki Drop 5: 'डंकी' नावाचा अर्थ तरी काय?; अखेर शाहरुख खानने केला खुलासा...

Dunki Drop 5: 'डंकी' नावाचा अर्थ तरी काय?; अखेर शाहरुख खानने केला खुलासा...

Dec 11, 2023 07:02 PM IST

Shah Rukh Khan Dunki Drop 5: या चित्रपटाचे नाव 'डंकी' का आहे? याचा अर्थ काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अखेर शाहरुख खान याने स्वतः या चित्रपटाच्या नावाचा अर्थ सांगितला आहे.

Shah Rukh Khan Dunki Drop 5
Shah Rukh Khan Dunki Drop 5

Shah Rukh Khan Dunki Drop 5: बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा 'डंकी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्या रेकॉर्ड्सची आशा आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूपच खास ठरले आहे. या वर्षात शाहरुख खान याचे रिलीज झालेले 'पठान' आणि 'जवान' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले होते. आता प्रेक्षकांच्या नजरा 'डंकी' या चित्रपटाकडे लागल्या आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव 'डंकी' का आहे? याचा अर्थ काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अखेर शाहरुख खान याने स्वतः या चित्रपटाच्या नावाचा अर्थ सांगितला आहे.

शाहरुख खान याचा 'डंकी' हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहतेही चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. '३ इडियट्स', 'पीके' आणि 'संजू' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या या चित्रपटाची कथा चार मित्रांभोवती फिरणारी आहे. भारतातून अवैधरित्या लंडनला जाणाऱ्या या चार मित्रांची धमाल कथा विनोदी ढंगात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आता शाहरुख खानने त्याच्या 'डंकी' या चित्रपटाच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते शाहरुख खान याला चित्रपटाच्या नावाचा अर्थ विचारत होते. 'डंकी' हा शब्द आंतरराष्ट्रीय सीमा बेकायदेशीरपणे ओलांडताना स्थलांतरितांनी स्वीकारलेल्या मार्गाचा संदर्भ देणारा आहे.

Chhapa Kata: तेजस्विनी लोणारी अन् मकरंद अनासपुरेंच्या जोडीची धमाल; ‘छापा काटा’ची महाराष्ट्राला आतुरता!

शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'डंकी ड्रॉप ५' म्हणजेच चित्रपटातील 'ओ माही' गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. यासोबतच, शाहरुख खानने यासोबत एक पोस्ट लिहिली आहे आणि चित्रपटाच्या नावाचा खरा अर्थ सांगितला आहे. शाहरुख खान म्हणाला, 'कारण प्रत्येकजण विचारतोय की, 'डंकी' म्हणजे काय? 'डंकी' म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तींपासून वेगळे होणे आणि जेव्हा आपण त्यांच्यासोबत असतो, तेव्हा असे वाटते की हा क्षण शेवटपर्यंत टिकून राहावा.'

राजकुमार हिरानीच्या या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर आणि बोमन इराणी यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा चार मित्रांची आहे ज्यांना परदेशात जायचे आहे. परंतु, तेथे पोहोचण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, त्यानंतर ते अवैध मार्ग निवडतात. या चित्रपटाची कथा हृदयाला भिडणारी आहे.

Whats_app_banner