
'पठाण' आणि 'जवान'नंतर आता शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचे जगभरात फॅन फॉलोइंग आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये किंग खानची तूफान क्रेझ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अर्थात एआयने त्याचे विविध डिस्नी पात्रांचे लूक बनवले आहेत.
या फोटोमध्ये शाहरुख खान लेगो लूकमध्ये दिसत आहे. लेगो लूकमध्येही अनेक सुपरहिरोचे चित्रपट बनवले गेले आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
'अवतार' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. जागतिक स्तरावर चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. या चित्रपट मालिकेतील आणखी चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत. या 'अवतार' विश्वात शाहरुख नक्कीच असाच दिसला असता.
झॉम्बी चित्रपट आवडणाऱ्या लोकांचा चाहता वर्ग वेगळाच आहे. जर, शाहरुख खान एखाद्या झॉम्बी चित्रपटाचा भाग असता, तर कदाचित तो असाच दिसला असता.
स्टोन युनिव्हर्सचा कंटेंटही प्रेक्षकांना आवडला आहे आणि जर शाहरुख खान त्याचा भाग असता तर, तो असाच काहीसा दिसला असता.
अलीकडच्या काळात अॅनिमी आवडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बरं, शाहरुख खान जर अॅनिमी वर्ल्डचा एक भाग झाला, तर ही क्रेझ आणखी वाढेल.
लहान मुलांना डिस्नीचे चित्रपट खूप आवडतात. त्यातील पात्र खूप क्यूट दिसतात. या लूकमध्ये शाहरुखही खूप क्यूट दिसत आहे.
सिनेजगतात, प्रिडेटर्स हा देखील एक प्रकारचा एलियन आहे. शाहरुख खान देखील 'प्रिडेटर' बनला तर असाच दिसेल.






