मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chhapa Kata: तेजस्विनी लोणारी अन् मकरंद अनासपुरेंच्या जोडीची धमाल; ‘छापा काटा’ची महाराष्ट्राला आतुरता!

Chhapa Kata: तेजस्विनी लोणारी अन् मकरंद अनासपुरेंच्या जोडीची धमाल; ‘छापा काटा’ची महाराष्ट्राला आतुरता!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 11, 2023 04:43 PM IST

Upcoming Marathi Movie Chhapa Kata: अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांची पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाली आहे.

Upcoming Marathi Movie Chhapa Kata
Upcoming Marathi Movie Chhapa Kata

Upcoming Marathi Movie Chhapa Kata: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांची पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाली आहे. या आधी देखील त्यांच्या 'बाप रे बाप डोक्याला ताप' या चित्रपटाने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. आता त्यांचा 'छापा काटा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘छापा काटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा आगामी मराठी चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपुरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून, मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Tharala Tar Mag 11th Dec: अर्जुनच्या वाढदिवशी सायलीला आठवणार का तिचा भूतकाळ? मालिकेत येणार ट्विस्ट!

या चित्रपटात प्रेम, भावना, उत्साह आणि मनमुराद गीतांचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातलं ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं रसिकांना प्रेमाच्या मोहक गंधात धुंद करत आहे. गाण्याचे बोल मेघना गोरे यांनी लिहिले असून, सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर यांनी बेधुंद संगीत दिले आहे. सुनिधि चौहान यांच्या आवाजतलं ‘मन हे गुंतले’ हृदय पिळवटून टाकणारं गाणं शिवम बारपांडे यांनी शब्दबद्ध केले असून, मराठी हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार गौरव चाटी यांनी संगीत दिले आहे. आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ शीर्षकगीत तसेच शशांक कोंडविलकरांनी शब्दबद्ध, गणेश सुर्वेंनी संगीत आणि गौरव चाटी यांनी स्वर दिलेलं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गोंधळगीताने महाराष्ट्रभर जोरदार धुमाकूळ घातला आहे.

धमाल विनोदी चित्रपट ‘छापा काटा’ १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून, पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे.

IPL_Entry_Point