मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: बॉलिवूडमध्ये पुन्हा रंगणार ‘खान’ वॉर? सलमानने नाकारली आमिर खानच्या चित्रपटाची ऑफर!

Salman Khan: बॉलिवूडमध्ये पुन्हा रंगणार ‘खान’ वॉर? सलमानने नाकारली आमिर खानच्या चित्रपटाची ऑफर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 30, 2023 10:17 AM IST

Salman Khan Rejected Aamir Khan movie: आमिर खान स्पॅनिश चित्रपट 'कॅम्पिओन्स'चा हिंदी रिमेक बनवत आहे. त्याच्या या चित्रपटाला 'चॅम्पियन्स' असे नाव देण्यात आले आहे.

Salman And Aamir Khan
Salman And Aamir Khan

Salman Khan Rejected Aamir Khan movie: बॉलिवूडवर सध्या सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांचे राज्य आहे. बॉलिवूडच्या या खान मंडळींनी आपल्या चित्रपटात काम करावं यासाठी सगळेच दिग्दर्शक रांगेत उभे असतात. ही खान मंडळी ज्या चित्रपटात असतात, तो चित्रपट हमखास १०० कोटींचा टप्पा गाठतो, अस सगळ्यांचाच समज आहे. या तिन्ही खानांमधील बाँडिंगही खूप चांगले आहे. पण, आता असे वाटत आहे की, हे चित्र लवकरच बदलणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने आमिर खानचा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आमिर खान स्पॅनिश चित्रपट 'कॅम्पिओन्स'चा हिंदी रिमेक बनवत आहे. त्याच्या या चित्रपटाला 'चॅम्पियन्स' असे नाव देण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अशी बातमी आली होती की, या चित्रपटाचा निर्माता आमिर खानने मुख्य भूमिकेसाठी सलमानशी संपर्क साधला होता. मात्र, आता सलमान खानने या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे.

Dipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आरएस प्रसन्ना दिग्दर्शित या आगामी स्पोर्ट्स ड्रामामध्ये आमिरसोबत काम करण्यासाठी सलमान खूप उत्सुक होता. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे सलमान खानला या चित्रपटासाठी नकार द्यावा लागला आहे. सलमानकडे आधीच ‘टायगर ३’, ‘टायगर व्हर्सेस पठाण स्पाय युनिव्हर्स’ आणि ‘किक सिक्वेल’ हे चित्रपट आहेत. या सोबतच तो या वर्षी ‘बिग बॉस ओटीटी २’ आणि ‘बिग बॉस सीझन १७’ देखील होस्ट करेल.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या या नकारामुळे आमिरला मोठा धक्का बसला आहे. यानंतर त्याने 'चॅम्पियन्स'मध्ये मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरशी संपर्क साधला आहे. रणबीरने कथा ऐकली असून, त्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला आहे. जर सर्व काही मान्य झाले, तर तो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट २०२४मध्ये चित्रपटगृहात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रणबीरचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग