मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Paresh Rawal Birthday: बॉसच्या लेकीवर फिदा झाले होते परेश रावल! ‘अशी’ होती अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी

Paresh Rawal Birthday: बॉसच्या लेकीवर फिदा झाले होते परेश रावल! ‘अशी’ होती अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 30, 2023 08:15 AM IST

Happy Birthday Paresh Rawal: अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या आणि बहुढंगी भूमिका साकारणाऱ्या परेश रावल यांची लव्हस्टोरीदेखील अगदी फिल्मी आहे.

Paresh Rawal
Paresh Rawal

Happy Birthday Paresh Rawal: बॉलिवूड अभिनेते परेश रावल आज (३० मे) त्यांचा ६८वा वाढदिवस साजरा करत आहेत. परेश रावल यांना ओळखत नाही, अशी क्वचितच एखादी व्यक्ती असू शकते. त्यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन करणाऱ्या परेश रावल यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तशी फारशी कुणाला माहिती नाही. अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या आणि बहुढंगी भूमिका साकारणाऱ्या परेश रावल यांची लव्हस्टोरीदेखील अगदी फिल्मी आहे. परेश रावल यांनी १९८७मध्ये ‘मिस इंडिया’ अभिनेत्री स्वरूप संपतशी लग्न केले होते.

स्वत: परेश रावल यांनी एका मुलाखतीत त्यांची रंजक प्रेमकहाणी शेअर केली होती. आपल्या पत्नीबद्दल बोलताना परेश म्हणाले होते की, स्वरूपला बघून पहिल्या नजरेतच मी मोहित झालो होतो. ही गोष्ट त्यांनी सगळ्यात आधी आपल्या मित्राला जाऊन सांगितली. परेश यांच्या मित्राला म्हणजेच महेंद्र जोशी यांना ही गोष्ट सांगत ते म्हणाले की, हीच मुलगी माझी बायको होईल. यावर महेंद्र त्यांना म्हणाला की, तू ज्या कंपनीत काम करतोस त्या कंपनीच्या बॉसची ती मुलगी आहे, हे तुला माहीत आहे ना? मात्र, परेश रावल यांनी स्वरूप यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय मनाशी पक्का केला होता.

Nilesh Sable: डॉक्टर ते अ‍ॅक्टर; असा सुरू झाला होता निलेश साबळेचा फिल्मी प्रवास!

परेश रावल यांनी स्वरूप संपत यांना १९७५मध्ये प्रपोज केला होता. त्यानंतर १९८७मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. पहिल्या भेटीनंतर दोन-तीन महिन्यांनी स्वतः परेश रावल यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत, स्वरूप यांना सांगितले की, ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. पण, आपण आधीच एकमेकांना ओळखतोय असे म्हणू नकोस. चल जरा आणखी पुढे जाऊ. मरेपर्यंत कोणीही कोणाला ओळखत नाही, म्हणून तू माझ्यासोबत मरणाच्या गोष्टी करू नकोस.’

‘मिस इंडिया’ ठरलेल्या स्वरूप संपत यांनी देखील परेश रावल यांचे प्रेम स्वीकारले. यानंतर त्यांनी एकमेकांना तब्बल १५ व्वार्षे डेट केले. अखेर १९८७मध्ये परेश रावल आणि स्वरूप संपत यांचे लग्न झाले. दोघांनीही त्यांच्या लग्नात खूप धमाल केली होती. त्यांचे लग्न लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडले होते. या जोडीला आता अनिरुद्ध रावल आणि आदित्य रावल अशी दोन मुले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग