मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  IIFA 2023: सलमान खानच्या बॉडीगार्ड्सनी विक्की कौशलला दिली अशी वागणूक; व्हिडीओ पाहून संतापले चाहते!
Salman Khan And Vicky Kaushal
Salman Khan And Vicky Kaushal

IIFA 2023: सलमान खानच्या बॉडीगार्ड्सनी विक्की कौशलला दिली अशी वागणूक; व्हिडीओ पाहून संतापले चाहते!

26 May 2023, 11:49 ISTHarshada Bhirvandekar

Salman Khan And Vicky Kaushal At IIFA 2023 : नुकतीच या पुरस्कार सोहळ्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी अभिनेता विकी कौशल आणि सलमान खान एकेमेकांच्या आमनेसामने आले होते.

Salman Khan And Vicky Kaushal At IIFA 2023 : सर्वात लोकप्रिय पुरस्कार सोहळ्यांपैकी एक 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स' आज (२६ मे) अबू धाबीच्या यास बेटावर सुरू होणार आहेत. या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी बी-टाऊनचे सर्व सेलिब्रिटी दुबईमध्ये पोहोचले आहेत. नुकतीच या पुरस्कार सोहळ्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी अभिनेता विकी कौशल आणि सलमान खान एकेमेकांच्या आमनेसामने आले होते. यावेळी सलमान खानच्या बॉडीगार्ड्सनी विकी कौशल अशी वागणूक दिली की, आता चाहते देखील संतापले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

गुरुवारी रात्री यास बेटावर आयफा पुरस्कार २०२३साठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सलमान खानपासून ते अभिषेक बच्चन आणि विकी कौशलसह अनेक सेलिब्रिटी याठिकाणी दिसले. या पत्रकार परिषदेतून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये विकी आणि सलमान एकमेकांशी भिडताना दिसले आहेत.

Vaibhavi Upadhyaya: नेमका कसा झाला वैभवी उपाध्यायचा अपघात? पोलीस म्हणतात ‘सीटबेल्ट न लावता...’

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशल त्याच्या चाहत्यांना सेल्फी देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, समोरून दबंग स्टाईलमध्ये सलमान खान अनेक बॉडीगार्ड्ससह येतो. विकी त्याला हॅलो म्हणतो आणि सलमानही त्याच्याशी बोलतो. मात्र, यादरम्यान एका गोष्टीने चाहत्यांना नाराज केले आहे. जेव्हा विकी कौशल सलमान खानशी बोलायला जातो, तेव्हा भाईजानचे बॉडीगार्ड त्याला बाजूला सारून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. बॉडीगार्ड विकीला सलमानशी बोलू देत नाहीत आणि त्याला बाजूला करून पुढे जायचा प्रयत्न करतात. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स भाईजानच्या बॉडीगार्डवर संतापले आहेत.

एक युजरने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ‘यांची वागणूक, हे किती असभ्य आहे.’ एकाने लिहिले की, ‘तुम्ही हे वर्तन एका अशा व्यक्तीशी करत आहात जो खरा हिरो आहे. विकीला सलमानबद्दल किती आदर आहे. तोच खरा अभिनेता आहे.’ आणखी एकाने कमेंट करत म्हटले की, ‘विकी खूप साधा माणूस आहे. सलमानचे बॉडीगार्ड्स मात्र भयानक आहेत.’ तर, एका युजरने म्हटले की, ‘तोही अभिनेता आहे, त्याचाही आदर करा.’ विकीला अशाप्रकारे बाजूला केल्यामुळे सलमानच्या सुरक्षा रक्षकावर लोक संतापले आहेत.