मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर

Dipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 30, 2023 08:52 AM IST

Dipika Kakar on quitting Industry: काही दिवसांपूर्वी दीपिकाने दिलेल्या मुलाखतीत तिने आपण अभिनयापासून दूर जाणार असल्याचे संकेत दिले होते. अभिनेत्रीचे बोलणे ऐकून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.

Dipika Kakar
Dipika Kakar

Dipika Kakar on quitting Industry: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम सध्या खूप चर्चेत आहेत. दीपिका गर्भवती असून, तिच्या उत्तम आरोग्यासोबतच बाळासाठीही चाहते प्रार्थना करत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी दीपिकाने दिलेल्या मुलाखतीत तिने आपण अभिनयापासून दूर जाणार असल्याचे संकेत दिले होते. अभिनेत्रीचे बोलणे ऐकून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आणि काही चाहते नाराजही झाले. मात्र, ही फेक न्यूज असल्याचे आणि अभिनेत्रीचा असा मानस नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणावर दीपिकाने आता सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी दीपिकाने एक मुलाखत दिली होती. यात दीपिकाने तिच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यादरम्यान बोलताना तिने बाळाच्या चांगल्या संगोपनासाठी अभिनय सोडण्याची मनीषा बोलून दाखवली होती. मात्र, आता हे सगळं खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दीपिकाने याबद्दल स्वतः खुलासा केला आहे. दीपिका म्हणाली की, 'मलाही नुकतेच कळले की, मी अभिनय करिअर सोडत आहे. लोकांनी माझ्या जुन्या मुलाखतीच्या कमेंटचा चुकीचा अर्थ लावला, ज्यात मी अभिनय सोडण्याबद्दल बोलले होते.’

Nilesh Sable: डॉक्टर ते अ‍ॅक्टर; असा सुरू झाला होता निलेश साबळेचा फिल्मी प्रवास!

दीपिका पुढे म्हणाली की, 'मी हे स्पष्ट करू इच्छिते की, असे काहीही नाही. मला नेहमीच एक आदर्श गृहिणी व्हायचे होते. शोएब ऑफिसला जाईल आणि मी त्याच्यासाठी नाश्ता बनवेन आणि कुटुंबाची काळजी घेईन, असे माझे स्वप्न होते. पण याचा अर्थ असा नाही की, मला कधीच काम करायचे नाही. कदाचित मी पुढील ४-५ वर्षे काम करू शकणार नाही. किंवा काही चांगली ऑफर आली तर, ती मी लगेच स्वीकारेन अशीही शक्यता आहे. मात्र, सध्या मी सुरुवातीची ४-५ वर्षे माझ्या मुलाला देण्याचा विचार केला आहे.’

दीपिका म्हणाली की, 'मी हे बोलले, कारण मी संसारच्या बाबतीत काहीशी जुन्या विचारांची व्यक्ती आहे. आणि मला वाटते की, जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा, त्याची काळजी आईने घेतली पाहिजे. सुरुवातीची काही वर्षे आई बाळाजवळच असली पाहिजे. हीच सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. मी माझ्या आजूबाजूला अशी मुले मोठी होताना पाहिली आहेत. आम्ही सकाळी अभ्यास करायचो, तेव्हा आई पण उठून बसायची. मला हे क्षण माझ्या मुलासोबत जगायचे आहेत. असे जीवन माझ्यासाठी स्वप्नवत असणार आहे. पण मी अभिनय सोडणार नाही.’

WhatsApp channel

विभाग