मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सिनेमा-वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रिया ही सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी? काय आहे सत्य

सिनेमा-वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रिया ही सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी? काय आहे सत्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 25, 2024 08:36 AM IST

आज २५ एप्रिल रोजी श्रिया पिळगावकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

सिनेमा-वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रिया ही सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी? काय आहे सत्य
सिनेमा-वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रिया ही सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी? काय आहे सत्य

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय व कायम चर्चेत असणारे कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ओळखले जातात. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर देखील आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे. तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये व सीरिजमध्ये काम केले आहे. अभिनयाच्या जोरावर श्रियाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज २५ एप्रिल रोजी श्रिया पिळगावकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

श्रियाच्या चित्रपटांविषयी

श्रियाने वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे. या मालिकेतून तिने खऱ्या अर्थाने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर श्रियाने शाहरुखच्या 'फॅन' या चित्रपटात देखील काम केले आहे. शिवाय, अतिशय लोकप्रिय सीरिज 'मिर्झापूर'मध्ये देखील ती दिसली होती. श्रियाने तिच्या अभिनयाची फ्रान्स चित्रपट निर्माता क्लाउड लेलचला देखील भूरळ घातली होती. त्याने त्याच्या 'अन प्लस उन' या फ्रान्स चित्रपटाची देखील श्रियाला ऑफर दिली होती.
वाचा: कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

श्रिया पिळगावकर जोडप्याची खरी मुलगी

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना सुरुवातीला मूल-बाळ होत नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी त्यांनी करिश्मा मखनी नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. पण करिश्माने सचिन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिने सचिन-सुप्रियाने तिला जबरदस्ती दत्तक घेतले, तसेच त्यानी त्यांचे नाव लावण्यासही तिला नकार दिल्याचे करिश्माने म्हटले होते. एकदा करिश्माला धक्के मारुन घराबाहेर काढल्याचा आरोप देखील तिने केला होता. करिश्मानंतर सचिन आणि सुप्रिया यांना श्रिया ही गोड मुलगी झाली. श्रिया ही या जोडप्याची पोटची पोरगी आहे.
वाचा: गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अनेकदा चाहते श्रिया ही सचिन-सुप्रिया यांची दत्तक पोरगी असल्याचे म्हणतात. पण त्यांना याबाबत सत्य माहिती नाही. श्रियाला सुप्रिया यांनी जन्म दिला आहे. आता श्रिया ही साधारण दोघांसारखी दिसत असल्याचे देखील म्हटले जाते.
वाचा: 'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

IPL_Entry_Point