मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 24, 2024 01:27 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला आणि अद्वैत यांची तू तू मैं मैं सारखी सुरु असते. आता त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे दिसत आहे.

कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'लक्ष्मीच्या पाऊलांनी.' या मालिकेत अद्वैत आणि कला यांची कथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांची केमिस्ट्री ही सर्वांना पाहायला आवडते. पण त्यांची सततची सुरु असलेली तू तू मै मै सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आता मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही कला सकाळी लवकर उठून हनूमान जयंतीची तयारी करताना होते. ते सर्व तयारी एकदम उत्तम प्रकारे करते. आबा ते पाहून आनंदी होतात. घरात सण असल्याची त्यांना जाणीव होते. पण अद्वैतची आई सतत कलाचा राग असते. तिला कलाच्या घरातले जराही आवडत नाहीत. ती सतत त्यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असते.
वाचा: 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

कलाचे कुटुंबीय अद्वैतच्या घरी

आबा हा सण दोन्ही कुटुंबीय एकत्र साजरा करावा यासाठी कलाच्या आई आणि बहिणीला बोलवतात. पण अद्वैतच्या आईने अट घातलेली असते जर कला तिच्या कुटुंबीयांना भेटली किंवा तिच्या घरातले घरी आले तरी त्यांच्यासोबत कलाही घरातून निघून जाणार. त्यामुळे कलाच्या आईला दारात पाहून ती त्यांना हकलून लावत असते. तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि आबांनीच त्यांना बोलावले असल्याचे सांगतो. त्यांना घरात घेऊन जातो.
वाचा: 'प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात', डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

कला आणि अद्वैत आले एकत्र

कला हनूमान जयंती सर्वांनी आनंदाने साजरी करावी यासाठी प्रयत्न करत असते. ती देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी काही तरी गोड बनवण्याचा निर्णय घेते. ती स्वयंपाक घरात जाऊन खीर बनवत असते. पण साखरेचा डब्बा हा वर ठेवलेला असल्यामुळे तो तिला काढता येत नाही. ती अद्वैतला तो डब्बा काढण्यासाठी सांगते. अद्वैत ती डब्बा काढतो आणि त्याचे झाकण खोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, डब्ब्याचे झाकण इतके घट्ट बसलेले असते की त्याला ते काढता येत नाही. कला तो डब्बा खेचून घेण्याचा प्रयत्न करते. पण दोघांनाही तो उघडला जात नाही. दरम्यान, दोघांमध्ये जवळीक निर्माण होते त्या डब्ब्यातील साखर नैवेद्यामध्ये पडते.
वाचा: चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिका…”

रोहिणी रचणार नवा कट

कलाच्या कुटुंबीयांना घरात पाहून रोहिणीला धक्का बसतो. ती त्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा प्रयत्न करते. ती वाटीत घेतलेली खिर मुद्दाम कलाच्या आईच्या साडीवर सांडवते आणि घालून पाडून बोलते. एकतर तुमची इतकी साधी साडी त्यात या साडीवर पडलेले डाग असे बोलते. कलाला ते खटकते पण ती फार काही बोलत नाही. आता मालिकेत पुढे काय होणार चला जाणून घेऊया..

IPL_Entry_Point