मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rinku Rajguru Post : सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरूने दिले स्पष्टीकरण; म्हणाली...

Rinku Rajguru Post : सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरूने दिले स्पष्टीकरण; म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 05, 2024 01:28 PM IST

Rinku Rajguru Post On Jalgaon Viral Video: एका व्हिडीओमध्ये रिंकू राजगुरू काही चाहत्यांवर ओरडताना दिसली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Rinku Rajguru Post On Jalgaon Viral Video
Rinku Rajguru Post On Jalgaon Viral Video

Rinku Rajguru Post On Jalgaon Viral Video: ‘सैराट’मधून घराघरांत पोहोचलेली ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतीच रिंकू राजगुरू हिने जळगावमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या दरम्यानचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू राजगुरू काही चाहत्यांवर ओरडताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर आता तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून घडल्याप्रकारावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. या स्टोरीमध्ये तिने लिहिले की, ‘जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत... नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमठिकाणी अशी कोणतीच घटना घडली नसून माझा हात खेचल्यामुळे एका रिप्रेझेंटेटिवजशी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती. तुमची, रिंकू'. तिची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमधून तिने या संपूर्ण प्रकरणावर आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिलं आहे.

Bhagirathi Missing Movie: महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारा ‘भागीरथी मिसिंग’! ‘या’ खास दिवशी होणार रिलीज

नेमकं प्रकरण काय?

जळगावमध्ये शासनाच्यावतीने महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने पाहुनी म्हणून हजेरी लावली होती. आपल्या लाडक्या ‘आर्ची’ची म्हणजेच रिंकू राजगुरूची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. चाहत्यांच्या या भरगच्च गर्दीतून रिंकूला बाहेरही पडणेही कठीण झाले होते. यावेळी चाहत्यांकडून तिला थोडी धक्काबुक्की देखील झाली. यावेळी वैतागलेल्या रिंकूने गर्दीला उद्देशून म्हटलं की, ‘तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का?' तिचा हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जळगावमधील कार्यक्रमाला ‘आर्ची’ म्हणजे रिंकू राजगुरू येणार असल्याचे कळताच लाखो चाहते या कार्यक्रमाला हजर झाले होते. त्यांची ही गर्दी पाहून आयोजकांची देखील तारांबळ उडाली होती. गर्दीतून रिंकूला बाहेर कसे काढावे, असा प्रश्न त्यांना देखील पडला होता. यातच चाहते रिंकूसोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी धडपड करत होते. या सगळ्या गर्दीत रिंकू राजगुरूला चाहत्यांचा धक्का देखील लागत होता. त्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली होती.

WhatsApp channel