Rajinikanth Viral Video: सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहतावर्ग केवळ साऊथमध्येच नाही तर, जगभरात पसरलेला आहे. रजनीकांत यांना इंडस्ट्रीत इतका मान मिळाला आहे, जो आजपर्यंत कदाचित कोणाला मिळाला नाही. लोक त्यांच्या अभिनयाचे इतके चाहते आहेत की, दक्षिणेत रजनीकांत यांची मंदिरेही बांधली गेली आहेत. रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते. पण आता लोक त्यान जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत. रजनीकांत यांचे चाहतेच त्यांना सोशल मीडियातून चार शब्द टोलवताना दिसत आहेत. रजनीकांत यांचा व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ याला कारणीभूत ठरला आहे.
आता अभिनेते रजनीकांत यांनी अशी कोणती चूक केली, ज्यामुळे ते आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत, असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात त्या एका व्हिडीओपासून झाली आहे, जो आता इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. रजनीकांत यांचा हा व्हिडीओ त्यावेळचा आहे, जेव्हा ते अंबानींच्या सेलिब्रेशनहून कुटुंबासह घरी परतत होते. त्यावेळी पापाराझींसमोर फोटो पोज देताना त्यांनी एक मोठी चूक केली.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, मीडियाला पाहून रजनीकांत थांबले आणि आपल्या कुटुंबासोबत फोटो पोज देऊ लागले. त्यावेळी त्यांचं सामान घेऊन फोटोमध्ये सामील होण्यासाठी आलेली त्यांच्या घरातील काम करणारी बाई देखील स्वतःला कुटुंबाचा भाग समजून फोटोत येण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, रजनीकांत यांचे लक्ष जाताच त्यांनी हाताने इशारा करून तिला तिथून म्हणजेच या फोटोतून निघून बाहेर निघायला सांगितले. रजनीकांत यांनी आपल्याच घरात काम करणाऱ्या महिलेला दिलेली अशा प्रकारची वागणूक पाहून लोक आता संतापले आहेत. अभिनेत्याची ही कृती लोकांना आवडली नाही आणि त्यामुळे ते ट्रोलर्सचा निशाणा बनले आहेत.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'अभिनेते फक्त कॅमेरासमोर चांगल्या लोकांसारखे वागत असतात पण प्रत्यक्षात?' एकजण म्हणाला, 'रजनीकांत, हे काय? आम्हाला आता आश्चर्यच वाटत आहे. लोकांना तुम्ही कसे वाटता आणि प्रत्यक्षात तुम्ही कसे आहात...’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘कौटुंबिक फोटो असला तरी सार्वजनिक ठिकाणी असे हातवारे करणारी व्यक्ती अजिबात चांगली वाटत नाही.’ एक युजरने लिहिले की, ‘हे लोक काही खरे हिरो नाहीत. आमच्या सामान्य प्रेक्षकांच्या पैशाने श्रीमंत आणि मोठे झाले. आम्ही त्यांना मोठे केले आणि ते आमच्यासारख्या सामान्य लोकांना तुच्छतेने पाहतात.’