Rajinikanth: एक-दोन नव्हे तब्बल २४ वर्षांनंतर रजनीकांत करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक! ‘या’ दिग्दर्शकाची मोठी घोषणा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajinikanth: एक-दोन नव्हे तब्बल २४ वर्षांनंतर रजनीकांत करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक! ‘या’ दिग्दर्शकाची मोठी घोषणा

Rajinikanth: एक-दोन नव्हे तब्बल २४ वर्षांनंतर रजनीकांत करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक! ‘या’ दिग्दर्शकाची मोठी घोषणा

Feb 28, 2024 12:12 PM IST

Rajinikanth Bollywood Comeback: गेल्या २४ वर्षांपासून रजनीकांत यांनी एकही बॉलिवूड चित्रपट केला नव्हता. मात्र, आता रजनीकांत यांनी आपला २४ वर्षांचा हा ब्रेक संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Rajinikanth Bollywood Comeback
Rajinikanth Bollywood Comeback

Rajinikanth Bollywood Comeback: सुपरस्टार रजनीकांत यांची फॅन फॉलोइंग जगभरात पसरलेली आहे. केवळ साऊथ मनोरंजन विश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्येही रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. साऊथ व्यतिरिक्त रजनीकांत यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्येही त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. पण, इतकं प्रेम मिळाल्यानंतर देखील गेल्या २४ वर्षांपासून रजनीकांत यांनी एकही बॉलिवूड चित्रपट केला नव्हता. मात्र, आता रजनीकांत यांनी आपला २४ वर्षांचा हा ब्रेक संपवण्याचा निर्णय घेतला आहे. रजनीकांत आता पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला याच्यासोबत हातमिळवणी करत त्यांचा आगामी चित्रपट साईन केला आहे. स्वतः साजिद नाडियादवाला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर रजनीकांत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी की, 'महान अभिनेते रजनीकांत सरांसोबत चित्रपट करणे हा खरा सन्मान आहे! आम्ही एकत्र या अविस्मरणीय प्रवासाची तयारी करत आहोत!’

Ashok Saraf: अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

२४ वर्षांनंतर रजनीकांत यांचं कमबॅक

साजिद नाडियादवाला यांनी सलमान खानचा चित्रपट 'किक' दिग्दर्शित केला होता. त्यांनी शेवट अभिनेता वरुण धवन याचा ‘बवाल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. रजनीकांत यांच्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘बुलंदी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ‘बुलंदी’ हा चित्रपट २०००साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘बुलंदी’ या चित्रपटात अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत अनिल कपूर, रवीना टंडन आणि रेखा मुख्य भूमिकेत होते. यांनतर रजनीकांत यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये काम केले नाही. नुकतेच रजनीकांत ‘लाल सलाम’ या चित्रपटात झळकले होते. मात्र, त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. ‘लाल सलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले होते.

निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांचा हा चित्रपट पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अद्याप या चित्रपटाविषयी इतर कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. तर, लवकरच चित्रपटाचे नाव जाहीर केले जाईल, असे म्हटले जात आहे.

Whats_app_banner