Lal Salaam Collection Box Office Collection: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या ‘लाल सलाम’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने हा चित्रपट बनवला असून, हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपट रिलीजसाठी देखील एक वेगळी वेळ निवडली होती. ‘लाल सलाम’च्या रिलीज दरम्यान कोणत्याही मोठ्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एन्ट्री घेतलेली नाही. दुसरीकडे या चित्रपटानंतर शाहिद कपूरचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ऐश्वर्या रजनीकांतच्या ‘लाल सलाम’सोबत प्रदर्शित झालेला ‘ईगल’ चित्रपट देखील फारशी कमाई करत नाहीये. इतका सगळा फायदा मिळत असताना देखील रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ फारसा कमाई करताना दिसत नाहीये.
‘लाल सलाम’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, रजनीकांत यांच्या या चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर १३.७३ कोटींची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाने रिलीजच्या ८व्या दिवशी अवघ्या २७ लाखांची कमाई केली आहे. एकंदरीत आता या चित्रपटाचे कलेक्शन घसरताना दिसत आहे. आता ८ दिवसांत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन केवळ १४ कोटी झाले आहे. ‘लाल सलाम’ या चित्रपटात रजनीकांत यांचा कॅमिओ आहे. मात्र, रंजीकांत यांचासारखा मोठा अभिनेता असताना देखील, त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीये.
‘लाल सलाम’ हा चित्रपट एका आठवड्यात १५ कोटी रुपयेही कमवू शकलेला नाही. या बिग बजेट चित्रपटाचे कलेक्शन पाहून निर्मात्यांना देखील धक्का बसणार आहे. या चित्रपटाच्या कमी कमाईमुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. ‘लाल सलाम’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ३.५५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ३.२५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ३.१५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी १.५५ रुपये, पाचव्या दिवशी १.४५ कोटी रुपये, सहाव्या दिवशी १.२१ कोटी आणि सातव्या दिवशी ८१ लाख रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट १५ कोटींच्या जवळपास पोहोचला आहे.
‘लाल सलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. त्यांचा हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. पण, तरीही हा चित्रपट लोकांना प्रभावित करू शकला नाही.