Nitish Bharadwaj Files Complaint Against Wife: प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या 'महाभारत' या मालिकेत ‘श्री कृष्णा’ची भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकणारे अभिनेते नितीश भारद्वाज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेते नितीश भारद्वाज यांनी त्यांची पत्नी आयएएस पत्नी स्मिता भारद्वाज यांच्या विरुद्ध भोपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नितीश भारद्वाज यांनी आपल्या तक्रारीत पत्नीने आपला मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी भोपाळ पोलीस आयुक्तांनी अतिरिक्त डीसीपी शालिनी दीक्षित यांच्याकडे पुढचा तपास सोपवला आहे. नितीश भारद्वाज यांच्या पत्नी स्मिता भारद्वाज राज्य मानव आयोगात कार्यरत आहेत.
नितीश भारद्वाज यांनी मध्य प्रदेशच्या आयएएस कॅडर स्मिता भारद्वाज यांच्यासोबत १४ मार्च २००९ रोजी लग्नगाठ बांधली होती. हे त्यांचे दुसरे लग्न होते. या दोघांची भेट काही कॉमन मित्रांच्या माध्यमातून झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले होते. या दोघांना दोन जुळ्या मुली आहेत. एका मुलीचे नाव दिव्यानी आणि दुसऱ्या मुलीचे नाव शिवरंजनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश भारद्वाज गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या वागण्याने खूप त्रासले होते. अनेक प्रयत्न करूनही त्यांचे वैवाहिक जीवन सुधारले नसून, आता त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे.
नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी स्मिता भारद्वाज यांच्यातील हा खटला मुंबई न्यायालयात सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेते नितीश भारद्वाज हे त्यांच्या पत्नीच्या वागण्यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या पत्नीने अभिनेत्याला त्यांच्या दोन्ही मुलींना भेटण्यास देखील बंदी घातली आहे. त्यांनी आपल्या मुलींची भेट घेऊ नये, म्हणून त्यांच्या दोन्ही मुलींच्या शाळा देखी अनेकदा बदलण्यात आल्या आहेत.
आपल्या पोटच्या मुलींना भेटता येत नसल्याने आता अभिनेते नितीश भारद्वाज खूपच अस्वस्थ झाले आहे. पत्नी स्मिता भारद्वाज यांच्या क्रूर आणि अमानुष वागणुकीमुळे त्रासलेल्या अभिनेता नितीश भारद्वाज यांनी भोपाळ पोलिस आयुक्तांकडे दाद मागितली आहे. तर, आता अभिनेत्याची तक्रार गांभीर्याने घेत पोलीस आयुक्तांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच, अतिरिक्त डीसीपी शालिनी दीक्षित यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.