मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajinikanth: एका मिनिटाचे १ कोटी! लेकीच्या चित्रपटात काम करण्यासाठी रजनीकांत यांनी घेतलं ‘इतकं’ मानधन!

Rajinikanth: एका मिनिटाचे १ कोटी! लेकीच्या चित्रपटात काम करण्यासाठी रजनीकांत यांनी घेतलं ‘इतकं’ मानधन!

Feb 08, 2024 09:25 PM IST

Rajinikanth Lal Salaam Fees: मीडिया रिपोर्टनुसार, ‘लाल सलाम’ या चित्रपटामध्ये रजनीकांत यांची ३० ते ४० मिनिटांची भूमिका आहे. या भूमिकेसाठी त्यांनी प्रति मिनिट फी आकारली आहे.

Rajinikanth Lal Salaam Fees
Rajinikanth Lal Salaam Fees

Rajinikanth Lal Salaam Fees: मनोरंजन विश्वाचे ‘थलायवा’ अर्थात अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ दिसू लागते. असाच काहीसा प्रकार ‘लाल सलाम’च्या बाबतीत घडत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. अभिनेते रजनीकांत ‘लाल सलाम’ या चित्रपटामध्ये कॅमिओ करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी आपल्या मुलीच्या चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी खूप मोठी फी आकारली आहे. रजनीकांत यांच्या फीचा आकडा ऐकून आता सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्टनुसार, ‘लाल सलाम’ या चित्रपटामध्ये रजनीकांत यांची ३० ते ४० मिनिटांची भूमिका आहे. या भूमिकेसाठी त्यांनी प्रति मिनिट फी आकारली आहे. रजनीकांत यांनी चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही, तर चित्रपटाच्या संवाद लेखनाची बाजूही सांभाळली आहे. रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी ‘लाल सलाम’ या चित्रपटात ३०-४० मिनिटांचा कॅमिओ केला आहे. या भूमिकेसाठी त्यांनी १ मिनिटासाठी १ कोटी रुपये आकारले आहेत. म्हणजेच त्यांनी या चित्रपटासाठी जवळपास ४० कोटी रुपये फी घेतली आहे. एआर रहमान यांनी चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या वेळी रजनीकांत यांचे आभार मानले होते.

Yami Gautam Pregnant: यामी गौतमने चाहत्यांना दिली गुडन्यूज; ‘आर्टिकल ३७०’च्या प्रमोशनदरम्यान दाखवला बेबी बंप!

‘लाल सलाम’ हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 'लाल सलाम' या चित्रपटात रजनीकांतचा जबरदस्त कॅमिओ आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या दुनियेत पुनरागमन करत आहे. ऐश्वर्या रजनीकांत हिने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. मात्र, अनेकांनी या चित्रपटाला 'संघी' म्हणत ट्रोल देखील केले.

‘लाल सलाम’ या चित्रपटाचं कथानक क्रिकेट आणि मैत्रीभोवती फिरणार आहे. या चित्रपटाला ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे. ‘लाल सलाम’ हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, चेन्नई आणि पुद्दुचेरी येथे झाले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग