मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajinikanth daughter Aishwarya: तिने तो शब्द वाईट आहे असे म्हटले नाही; मुलीसाठी रजनीकांत आले धावून! नेमकं घडलं काय?

Rajinikanth daughter Aishwarya: तिने तो शब्द वाईट आहे असे म्हटले नाही; मुलीसाठी रजनीकांत आले धावून! नेमकं घडलं काय?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2024 09:40 AM IST

Rajinikanth Support daughter Aishwarya: रजनीकांतने मुलगी ऐश्वर्याला पाठिंबा देण्यासाठी केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

Rajinikanth daughter Aishwarya
Rajinikanth daughter Aishwarya

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ही सध्या चर्चेत आहे. तिने ‘संघी’ शब्दावरून केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले. अनेकांनी ऐश्वर्यावर टीका केली. आता रजनीकांत यांनी वक्तव्य करत मुलीला पाठिंबा दिला आहे. रजनीकांत नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

ऐश्वर्या रजनीकांत सध्या तिचा आगामी चित्रपट 'लाल सलाम'चे प्रमोशन करताना दिसत आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. २६ जानेवारीला चेन्नईतील एका खासगी महाविद्यालयात ‘लाल सलाम’ चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम झाला. यावेळी ऐश्वर्या म्हणाली, “मी सहसा सोशल मीडियापासून दूर राहते, पण माझी टीम अनेकदा मला काय घडत आहे ते सांगते आणि काही पोस्ट्स दाखवत राहते. त्या पाहून मला राग यायचा. आपणही माणसे आहोत. अलीकडच्या काळात बरेच लोक माझ्या वडिलांना संघी म्हणतात. मला त्याचा अर्थ काय आहे हे माहित नव्हते. मग मी कोणाला तरी विचारले की संघीचा अर्थ काय आहे आणि ते म्हणाले की जे लोक एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करतात त्यांना संघी म्हणतात. मी इथे स्पष्ट करू इच्छिते की माझे वडील रजनीकांत हे संघी नाहीत. ते संघी असते तर त्यांनी ‘लाल सलाम’ सारखा चित्रपट केला नसता.”
वाचा: मयूरी देशमुखच्या 'लग्नकल्लोळ'चा टीझर पाहिलात का? होईल हसू अनावर

ऐश्वर्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली होती. आता रजनीकांत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. “माझ्या मुलीने संघी हा शब्द वाईट आहे असे कधीच म्हटले नाही. तिने प्रश्न केला की तिचे वडील अध्यात्मिक आहेत, मग त्यांना अशा प्रकारे संघी का म्हटले जात आहे” असे रजनीकांत म्हणाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४