‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. दोन वर्षांपू्र्वी तिच्या पतीचे निधन झाले. आत्महत्या करत मयुरीच्या पतीने जीवन संपवले होते. पती आशुतोषच्या जाण्याच्या धक्क्यातून अभिनेत्री मयुरी देशमुख स्वतः सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा जोमाने उभे राहण्याचा प्रयत्न करते आहे. आता तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'लग्नकल्लोळ' असे असून चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'लग्नकल्लोळ' चित्रपटाच्या टीझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका १ मार्चला उडणार आहे.
वाचा: 'या' आठवड्यात हे चित्रपट आणि वेबसीरिज होणार रिलीज
'लग्न कल्लोळ' या चित्रपटात मयूरीसोबत सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शक आहेत. आता सर्वजण चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.